26 January 2022

रक्तदानाच्या संकल्प पुर्तीने युवकाने केला वाढदिवस साजरा...

 

●● रक्तदानाच्या संकल्प पुर्तीने युवकाने केला वाढदिवस साजरा ●●

संकल्प केला बंधुत्वाने ।
निश्चयपूर्ती रक्तदानाने ।।

◆ काळाच्या ओघात मानवाची मदतगार वृत्ती संपुष्टात येत असल्याच सर्वत्र बोलल्या जाते. वेळेला महत्त्व देऊन कार्य करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आजही मदत मागणाऱ्या हातापेक्षा मदतीसाठी उचलले जाणारे हात कमी नाहीत.
        वाढदिवशी रक्तदानाचा संकल्प करणारे नियमित रक्तदाते सत्यम कोमलवार यांनी श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढीत वाढदिवसानिमित्त स्वैच्छिक रक्तदान करुन एका निष्पाप जिवाची मालवणारी ज्योत तेजवीत राहावी, यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या अमूल्य सात्विक दानाचा उपयोग अपघात ग्रस्त, तातडीच्या अवघड व मोठ्या शस्त्रक्रिया, बाळंतपणात होणारा अतिरक्तस्राव, थॅलेसिमिया बालक या व अशा अनेक रुग्णांना होणार आहे.
          प्रजासत्ताक दिन व वाढदिवस य दुहेरी पर्वावर सत्यमदादा यांनी रक्तदान करून देशभक्तीच बीज रोवल, या प्रेरणात्मक कार्याला यशवंत गिरी ( यवतमाळ पोलिस )आणि प्रफुल भोयर यांचे सहकार्य मिळाले.

-Praful Bhoyar
7057586468




No comments:

Post a Comment

कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...