04 January 2022

निस्वार्थ सेवा करणारे मा. नगरसेवक नितिनदादा मिर्झापुरे यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा !


साऱ्यांच्या कल्याणासाठी

प्राण पणाला लावू ।।

गरजूंचे अश्रु पुसूया 

आधार तयांना देऊ ।।

     असे आपल्या जगण्याचे ब्रिद ठरवून जनतेची निस्वार्थ सेवा करणारे मा. नगरसेवक नितिनदादा मिर्झापुरे यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा !

      नितीनदादा एक तरुण व्यक्तित्त्व. ज्यांनी समाजाच्या कल्याणाची पताका हाती घेतली. आपल्या परीने होणारी कित्येक समाजोपयोगी कामे केली. रडणाऱ्या माणसाच्या डोळ्याचे अश्रु पुसणे, त्यांना सुरक्षित जगण्याचा हक्क प्रदान करणे हे दादांच्या कार्याचं मुख्य धोरण आहे. नितीनदादा अडलेल्या, अडचणीत असणाऱ्यांना, मनाने खचलेल्यांना, अनाथ, बेघर, निराधार, दुःखी लोकांचे कैवारी, रक्षणकर्ते आहे.  ज्यांनी आपल्या आयुष्याचा अल्पावधीतच साऱ्यांच मन जिंकलं आणि संपुर्ण यवतमाळकर तरुणांचे प्रेरणास्थान म्हणून आपल्या स्थानावर विराजमान आहे.

     नितीनदादाची समाजसेवेच्या उद्देशाने उभारलेली प्रत्येक चळवळ यशस्वी आहे. समाजासाठी काही तरी करता यावे यासाठी आपले सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्य समजुन मानवहितार्थ कामे पाहतात.

     मानवाची न संपणारी गरज रक्त. दादांची युवा चळवळ सामुहिक रक्तदानातून युगांना चिरकाल टिकणारी प्रेरणा देतात. अनेक रुग्ण जिवांना मदत करुन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दाखवतात. कुणाची हानी होऊ नये यासाठी तत्पर असलेले नितीनदादा इतरांना मानवता शिकवतात. त्यांचे निर्णय गौरवास्पद व समाजाला ऊर्जा देणारे आहे.

     विद्यार्थी, कष्टकरी, भूमिपुत्र, कामगार यांच्यासाठी सुनियोजित विकासाची संकल्पना मांडून शांततेचा संदेश समाजाला देत प्रगतीच्या पाऊलखुणा जोपासल्या.

     आपल्या कार्यातून मोलाची सेवा ते समाजला देत आहेत.


पुनःश्च एकदा धन्यवाद दादा...

✍🏻- प्रफुल्ल भोयर यवतमाळ

         *७०५७५८६४६८


https://prafulbhoyar.blogspot.com/2022/01/Birthday-NitinDadaMirzapure.html

No comments:

Post a Comment

कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...