मानवसेवार्थ रक्तदानातून जपली मानवता 🌱
◆ मानवतेची सर्वोच्च सेवा रक्तदान✨
यवतमाळ:- मानवाने आपली जमापुंजी पुण्य रूपात साठवायची झाली तर रक्तदान हा सर्वोत्तम मार्ग आहे. या पुण्यकर्मातून मानवता जपण्याचा हा प्रयत्न तरुणांसाठी मोलाचा संदेश देतो. रक्तविर बहुउद्देशीय संस्था तर्फे नियमित व्यापक स्तरावर रक्तदान जनजागृती करण्यात येत असते. त्यासाठी अग्रगण्य असलेले प्रफुल भोयर यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन रक्तदाते कुणाल गिरी यांनी श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथे स्वैच्छिक रक्तदान केले.
शासकीय रक्तपेढीतून सर्व प्रकारच्या रुग्णांना रक्तपुरवठा केला जातो. त्यासाठी रक्तदाते महत्वाची भूमिका बजावतात रक्तदाते टिकून राहावे, रक्तदानात नियमितता यावी यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती आवश्यक आहे. प्रफुल भोयर यांनी आपल्या निस्वार्थी प्रयत्नातून अनेक रुग्णांना नवजीवन मिळवून दिले. ही प्रेरणादायी कृती रक्तस्नेही ठरत आहे. रक्तदानासारख्या पुण्यकर्मातून मानवता जपण्याचा त्यांचा हा प्रयत्न खरोखरच अभिमानास्पद आहे.
गरजु रुग्णांना जीवनदान देण्याच्या उद्देशाने केलेले रक्तदान हे सर्वोच्च दान मानले जाते, त्यातून रुग्णांचे प्राण वाचतात यामुळे कुणाल गिरी यांनी केलेलं रक्तदान मानवसेवार्थ ठरते. यावेळी रक्तविर बहुउद्देशीय संस्था तर्फे रक्तदान करण्यासाठी तरुणांना आवाहन करण्यात आलं आहे.





0 Comments