वृत्तपत्र देशोन्नती ने घेतली महाराष्ट्र स्तरावर प्रफुल्ल भोयर यांची दखल
माननीय राज्यमंत्री तथा शिक्षणमंत्री श्री. बच्चूभाऊ कडु यांनी यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन येथील प्रफुल्ल भोयर या युवकाचा त्याच्या समाजसेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन गौरव केला. प्रफुल्ल यांनी केलेल्या समाजसेवेची व राज्यमंत्री साहेब यांनी केलेल्या गौरवाची दखल राज्यस्तरीय देशोन्नती वृत्तपत्राच्या मुख्य पेपरच्या अमरावती विभाग या पानावर छापून प्रकाशित करण्यात आली. त्याबद्दल देशोन्नती चे मुख संपादक आणि यवतमाळ देशोन्नती कार्यालय यांचे विशेष आभार. प्रफुल्ल भोयर यांनी महाराष्ट्रातील अगदी लहान वयाचा समाजसेवक अशी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. प्रफुल्ल यानी महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल तथा यवतमाळ जिल्हा प्रशासनाकडून सन्मान मिळवला आहे.
No comments:
Post a Comment