दुर्मिळ बॉम्बे ब्लड गृप ने वाचविले एका आईचे प्राण
◆ रक्तदानातून जागविला मानवतेचा संदेश : मैत्री परिवार उपक्रम
परमेश्वराला एकाच वेळी प्रत्येकाकडे येता येत नाही म्हणून आई निर्माण केली. आई हे आपल्याला लाभलेल ईश्वराच वरदान आहे. ज्यांनी जीवनातील आईच महत्व जाणलं त्यांना सर्व काही मिळते.
यवतमाळ येथील प्रमोद बोबडे यांच्या आईला अपघातातील दुखापतीमुळे गंभीर इजा पोहोचल्या. त्यामुळे त्यांची प्रकृती फारच खालावली. गेल्या काही दिवसांपासून त्या उपचार घेत होत्या. त्यांना रक्ताची गरज आहे आणि हे रक्तगट अगदीच दुर्मिळ आहे हे जेव्हा कळलं तेव्हा सगळेच घाबरले. कारण इतक्या दुर्मिळ रक्तगटाचा रक्तदाता आणायचा कुठून, कसा शोधायचा.
यावेळी उमरखेड येथील अभिषेक ठाकूर यांना मिळालेल्या मॅसेज वरून आपण रक्तदाता देऊ शकतो, असे त्यांनी जाणले आणि रुग्ण नातेवाईकांशी संपर्क साधला. अनेक मेहनतीनंतर माधव सुवर्णकार आणि ओमप्रकाश पंडित हे दोघे दुर्मिळ बॉम्बे रक्तगटाच्या रक्तदात्यांचा शोध लागला.
नांदेड ला राहणाऱ्या रक्तदात्यांचे नागपूरला प्रयाण करायचे ठरले. त्यांनी आपलं हातातील काम सोडून त्वरित निघाले. नागपूरच्या होकार्ट हॉस्पिटलमधील रुग्णासाठी रक्तदान करून एका आईचे प्राण वाचवून जीवनदान दिले.
कुठलाही विचार न करता तात्काळ येऊन रक्तदान केल्यामुळे या दातृत्वातून मानवतेचा संदेश जगाला दिल्या गेला. एक मुलाला आपली आई परत मिळाली. परमेश्वरा समान आईला जीवनदान देण्याची संधी लाभणे याहून भाग्य ते आणखी काय असेल?
रक्तदाता शोधण्यासाठी अभिषेक ठाकूर, प्रफुल भोयर आणि सागर कोल्हे यांनी परिश्रम घेतले.
◆◆◆◆ मैत्री परिवार संस्थापक अध्यक्ष अभी ठाकुर यानी त्यांच्या एका शब्दाला मान देऊन बॉम्बे ब्लड ग्रुप डोनर माधव जी सुवर्णकार व ओमप्रकाश जी पंडित नांदेड़ वरुन नागपुर जाऊन रक्तदान केल्यामुळे त्यांचे मनापासून आभार मानले आहे.
-अभिषेक ठाकुर ( मैत्री परिवार )
◆◆◆◆ बॉम्बे ब्लड ग्रुप हे खूप दुर्मिळ आहे. अशा रक्तदात्यांचा शोध घेऊन त्यांना रिझर्व्ह ठेवणं आवाहन आहे. आज या रक्तदात्यांनी त्यांच्या दातृत्वातून मानवतेचा संदेश सर्वांना दिला. आपला रक्तगट कोणता आहे हे ज्याचे त्यालाच माहीत असते. अशा काही दुर्मिळ वेळी दुर्मिळ रक्तदात्यांनी स्वैच्छिक समोर येऊन रक्तदान करा ज्यामुळे कुणाचा तरी जीव नक्कीच वाचेल.
-प्रफुल भोयर (मुकुटबन )
No comments:
Post a Comment