16 January 2022

मुकुटबन येथे राष्ट्रीय युवा दिवस साजरा...

 मुकुटबन येथे राष्ट्रीय युवा दिवस साजरा

युवकांनी केले मासाहेब जिजाऊंना अभिवादन

          12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद जयंती म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येते. त्या अनुषंगाने नेहरू युवा केंद्र यवतमाळ तसेच युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय अंतर्गत जिह्यातील झरी जामनी तालुक्यात राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यात आला.

          यावेळी रक्तविर बहुउद्देशीय संस्थेचे श्री. गणेशभाऊ मुद्दमवार यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. युवकांनी आपले ध्येय गाठण्यासाठी सकारात्मक विचार, दृढता, सचोटी, प्रामाणिकपणा, इत्यादी गुण आपल्या अंगी धारण करावे, असे ते म्हणाले.

         राजमाता जिजाऊंनी छत्रपती राज्यांना घडवले, त्याप्रमाणे सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना सुसंस्कारित करावे तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रमाणे सर्व युवकांनी आध्यत्मिकतेद्वारे आपले व्यक्तिमत्व घडवावे, असे विचार उपस्थितांना दिले.

        कार्यक्रमाला प्रियल पथाडे, नितीश कुंटावार,  रितिक राऊत, प्रज्वल राऊत, भाविक दिवटे, प्रफुल गोंडे, धिरज कुसराम, प्रफुल भोयर आणि तालुका स्वयंसेविका ईत्यादी युवक युवती उपस्थित होते. यावेळी विविध स्पर्धात्मक  कार्यक्रम घेण्यात आले. आणि युवकांना गौरविण्यात आले.




No comments:

Post a Comment

कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...