स्वामी विवेकानंदाची शिकवण युवकांनी आत्मसात करावी
◆ नेहरु युवा केंद्र यवतमाळ तर्फे स्वामी विवेकानंद जयंती समारोह
◆युवकांना मार्गदर्शन करताना वनविभागाचे मा.कुणाल सावरकर सर
आज मुकुटबन येथील श्री. गुरुदेव वाचनालयात नेहरू युवा केंद्र यवतमाळ तर्फे स्वामी विवेकानंद जयंती निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला मान्यवर म्हणून मुकुटबन वनविभागाचे श्री. कुणाल सावरकर सर उपस्थित होते. तालुक्यात स्वामी विवेकानंद जयंती निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. आजच्या "स्वामी विवेकानंद आणि युवक" या विषयावरील निबंध स्पर्धेत अनेक युवकांनी सहभाग नोंदविला. यामध्ये गृहरक्षक दलाचे वैभव गोर्लावार, प्रफुल भोयर, विरेंद्र कुरमेलवार, गणेश पिंपळशेंडे, तसेच युवक उपस्थित होते. यावेळी प्रथम क्रमांक कु. दिक्षा मंदावार, द्वितीय वैभव गोरलावार, तृतीय क्रमांक गणेश रुयारकर यांनी मिळवला. यावेळी स्वामी विवेकानंद यांचे जीवनचरित्र, प्रमाणपत्र व मेडल देऊन श्री. सावरकर सर यांच्या हस्ते युवकांना गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित युवक युवतींना कुणाल सावरकर यांनी जल संवर्धन, जंगल संवर्धन, वन जैवविविधता, वनराई बंधारे आणि युवकांची जबाबदारी या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले.
नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेविका प्रविणा भोयर यांनी ग्रामीण युवक आणि करिअर च्या संधी व स्वामी विवेकानंद व युवक या विषयावर प्रेरणात्मक मार्गदर्शन केलं. यावेळी कु. स्नेहा शिरपुरे यांनी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेविका प्रविणा भोयर यांनी ग्रामीण युवक आणि करिअर च्या संधी व स्वामी विवेकानंद व युवक या विषयावर प्रेरणात्मक मार्गदर्शन केलं. यावेळी कु. स्नेहा शिरपुरे यांनी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
वनविभागाचे सावरकर सर यांनी युवकांना जल संवर्धन, जंगल संवर्धन तसेच वन जैवविविधता, वनराई बंधारे आणि युवकांची जबाबदारी या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. |
.
No comments:
Post a Comment