30 January 2022

वृत्तपत्र देशोन्नती ने घेतली महाराष्ट्र स्तरावर प्रफुल्ल भोयर यांची दखल ...

वृत्तपत्र देशोन्नती ने घेतली महाराष्ट्र स्तरावर प्रफुल्ल भोयर यांची दखल 


          माननीय राज्यमंत्री तथा शिक्षणमंत्री श्री. बच्चूभाऊ कडु यांनी यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन येथील प्रफुल्ल भोयर या युवकाचा त्याच्या समाजसेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल  शाल व श्रीफळ देऊन गौरव केला. प्रफुल्ल यांनी केलेल्या समाजसेवेची व राज्यमंत्री साहेब  यांनी केलेल्या गौरवाची दखल राज्यस्तरीय देशोन्नती वृत्तपत्राच्या मुख्य पेपरच्या अमरावती विभाग या पानावर छापून प्रकाशित करण्यात आली. त्याबद्दल देशोन्नती चे मुख संपादक आणि यवतमाळ देशोन्नती कार्यालय यांचे विशेष आभार. प्रफुल्ल भोयर यांनी महाराष्ट्रातील अगदी लहान वयाचा समाजसेवक अशी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. प्रफुल्ल यानी महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल तथा यवतमाळ जिल्हा प्रशासनाकडून सन्मान मिळवला आहे.

26 January 2022

रक्तदानाच्या संकल्प पुर्तीने युवकाने केला वाढदिवस साजरा...

 

●● रक्तदानाच्या संकल्प पुर्तीने युवकाने केला वाढदिवस साजरा ●●

संकल्प केला बंधुत्वाने ।
निश्चयपूर्ती रक्तदानाने ।।

◆ काळाच्या ओघात मानवाची मदतगार वृत्ती संपुष्टात येत असल्याच सर्वत्र बोलल्या जाते. वेळेला महत्त्व देऊन कार्य करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आजही मदत मागणाऱ्या हातापेक्षा मदतीसाठी उचलले जाणारे हात कमी नाहीत.
        वाढदिवशी रक्तदानाचा संकल्प करणारे नियमित रक्तदाते सत्यम कोमलवार यांनी श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढीत वाढदिवसानिमित्त स्वैच्छिक रक्तदान करुन एका निष्पाप जिवाची मालवणारी ज्योत तेजवीत राहावी, यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या अमूल्य सात्विक दानाचा उपयोग अपघात ग्रस्त, तातडीच्या अवघड व मोठ्या शस्त्रक्रिया, बाळंतपणात होणारा अतिरक्तस्राव, थॅलेसिमिया बालक या व अशा अनेक रुग्णांना होणार आहे.
          प्रजासत्ताक दिन व वाढदिवस य दुहेरी पर्वावर सत्यमदादा यांनी रक्तदान करून देशभक्तीच बीज रोवल, या प्रेरणात्मक कार्याला यशवंत गिरी ( यवतमाळ पोलिस )आणि प्रफुल भोयर यांचे सहकार्य मिळाले.

-Praful Bhoyar
7057586468




20 January 2022

स्वामी विवेकानंदाची शिकवण युवकांनी आत्मसात करावी....

 स्वामी विवेकानंदाची शिकवण युवकांनी आत्मसात करावी

◆ नेहरु युवा केंद्र यवतमाळ तर्फे स्वामी विवेकानंद जयंती समारोह

युवकांना मार्गदर्शन करताना वनविभागाचे मा.कुणाल सावरकर सर

       आज मुकुटबन येथील श्री. गुरुदेव वाचनालयात नेहरू युवा केंद्र यवतमाळ तर्फे स्वामी विवेकानंद जयंती निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला मान्यवर म्हणून मुकुटबन वनविभागाचे श्री. कुणाल सावरकर सर उपस्थित होते. तालुक्यात स्वामी विवेकानंद  जयंती निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. आजच्या "स्वामी विवेकानंद आणि युवक" या विषयावरील निबंध स्पर्धेत अनेक युवकांनी सहभाग नोंदविला.       यामध्ये गृहरक्षक दलाचे वैभव गोर्लावार, प्रफुल भोयर, विरेंद्र कुरमेलवार, गणेश पिंपळशेंडे, तसेच युवक उपस्थित होते. यावेळी प्रथम क्रमांक कु. दिक्षा मंदावार, द्वितीय वैभव गोरलावार, तृतीय क्रमांक गणेश रुयारकर यांनी मिळवला.            यावेळी स्वामी विवेकानंद यांचे जीवनचरित्र, प्रमाणपत्र व मेडल देऊन श्री. सावरकर सर यांच्या हस्ते युवकांना गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित युवक युवतींना कुणाल सावरकर यांनी जल संवर्धन, जंगल संवर्धन, वन जैवविविधता, वनराई बंधारे आणि युवकांची जबाबदारी या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले.
     नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेविका प्रविणा भोयर यांनी ग्रामीण युवक आणि करिअर च्या संधी व स्वामी विवेकानंद व युवक या विषयावर प्रेरणात्मक मार्गदर्शन केलं. यावेळी कु. स्नेहा शिरपुरे यांनी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
Deshonnati Yavatmal






वनविभागाचे सावरकर सर यांनी युवकांना जल संवर्धन, जंगल संवर्धन तसेच वन जैवविविधता, वनराई बंधारे आणि युवकांची जबाबदारी या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले.
































.


17 January 2022

शालेय शिक्षण मंत्री मा. श्री बच्चुभाऊ कडु यांच्या हस्ते प्रफुल भोयर यांचा सत्कार....

शालेय शिक्षण मंत्री मा. श्री बच्चुभाऊ कडु यांच्या हस्ते प्रफुल भोयर यांचा सत्कार....


आज झालेल्या माननीय राज्यमंत्री यांच्या यवतमाळ दौऱ्यात माझा माननीय बच्चुभाऊ कडु यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

      विद्यार्थीदशेत झालेला माझ्या कार्याचा गौरव सर्व तरुण वर्गाला प्रेरणा देईल. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री श्री.बच्चुभाऊ कडु यांचे खूप खूप आभार.
     तसेच यवतमाळ चे #नगरसेवक तथा जिल्हा प्रमुख नितीन दादा मिर्झापुरे यांचे ही अनेक आभार.
✨✨✨🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳🇮🇳













@दैनिक देशोन्नती मेन मध्ये दखल...


मा. समाजसेवा अधिक्षक सरांसोबत...!

दयेचा झरा तुम्ही,

नि मानवं  पुजारी।

थोर सेवा तुमची,

यातना दूर सारी।।

कठीणातील कठीण प्रसंगात पुन्हा धीराने उभ राहण्याचं बळ देणारे, आपल्या कार्याने मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानणारे, श्री वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय  समाजसेवा अधिक्षक मा खडसे सरांसोबत एक क्षण...!!!




कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...