31 December 2020

जरा विसावू या वळणावर...!


◆ जरा विसावू या वळणावर.....…..!

संपलं जून वर्ष
झालं नवं सुरू
आनंदाच्या काळाच 
उत्साहानं स्वागत करू.....

मागे वळून पाहता
आठवणींचा अल्बम चाळू
सुख-दुःखाच्या भावना
येई उचंबळून.....

जाणारे वर्ष केवळ
आकडे मोजत जाई
न मिटणाऱ्या पाऊलखुणा
फक्त मागे राही.....

काळ असाच धावतो
त्याचे पाऊल वाजत नाही
आपण आपल्याच नादात
वर्ष नवे पुढे येई......

आयुष्याच्या क्षणांचा
आपुलकी भार वाही
किती कमवलं-गमवलं
बाकी काय राही.....

संघर्षातून कशी
आव्हान पेलली
आयुष्यान किती 
धडे शिकविली......

आशा उल्हासिते मना
निश्वासे उपाय बनून
चैतन्यान प्रगल्भ होऊ
संकल्प म्हणून.........

✍🏻प्रफुल्ल भोयर मुकुटबन
    (7057586468)
💐💐💐🎊🎊🎊

30 December 2020

रक्तदान करण्यासाठी तरुणांना आवाहन...

◆ रक्तदान करून देशाला वाचवा

        देशाला देण्यासाठी आपल्याकडे 10 मिनिटे वेळ आहे का ? असेल तर ऐका! आपल्या देशाला व आपल्या लोकांना आपली गरज आहे. कोविडमुळे संपूर्ण जग संकटात आहे. कोविडच्या रुग्णाला बरे करण्यासाठी शासकीय स्तरावर कसोशीचे प्रयत्न चालू आहे. रक्तातून निघणार कन्व्हर्जन Plasma थेरपी चा प्रयोग कोविड रुग्णाला चालू आहे यासाठी रक्ताची  गरज आहे. 

           दररोज अनेक प्रकारचे गरजू गरीब रुग्ण उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल होत असतात. त्यामध्ये गरोदर महिला, ऍनिमिया, सिकलसेल, अपघातग्रस्त तसेच रक्तसंबंधीत आजाराच्या रुग्णाचा समावेश आहे. या प्रत्येक गरजूंपर्यंत रक्ताची मदत पोहोचवायची म्हणजे रक्तदात्यांची मोठया प्रमाणात नितांत गरज आहे.

        कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थिती ला हाताळणे प्रत्येकासाठी एक आव्हान आहे.

      कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे स्वैछिक रक्तदानाकडे रक्तदात्यांनी जवळ जवळ पाठच फिरवली आहे. मी प्रफुल भोयर जिल्हा रक्तपेढी ग्रुप यवतमाळ च्या वतीने प्रत्येक तरुणास जे रक्तदान करू शकतात अश्यांना कडकडीने आवाहन करतो की ज्या कोणाला शक्य आहे त्यांनी शासकीय रक्तपेढीत जाऊन स्वैछिक रक्तदान करा.

आपलं अमूल्य योगदान देशाला वाचविण्यासाठी द्या.:-- प्रफुल्ल भोयर

रक्तविर बहुउद्देशीय संस्था,

मुकुटबन

7057586468





20 December 2020

थेंब हा रक्ताचा, आधार बनेल रुग्णाचा...

 ◆ थेंब हा रक्ताचा, आधार बनेल रुग्णाचा ।।🩸


       कुठे तरी कुणाला तरी रक्ताची गरज आहे. हे कळताच लगेचच अक्षय कोडाणे दादा यांनी प्रफुल भोयर यांच्याशी संपर्क करुन रुग्णाला विचारपुस केली व रक्तदानास तयार असल्याच कळवले कोणताही विचार न करता प्रफुल भोयर यांनी मदत करण्याचा उद्देशाने आकाश दादा यांना शासकीय रक्तपेढी यवतमाळ येथे आणुन रक्तदान करुन घेतलं पुन्हा एकदा प्रफुल यांनी आपण रुग्णांसोबत असल्याची जाणीव करुन दिली.

       पंजाब बदकी यांना रक्ताची गरज असल्याची माहिती यवतमाळ जिल्हा रक्तपेढी ग्रुप वरुन कळली व त्यांना लगेच रक्ताची व्यवस्था करुन देण्यात आली. काल त्यांचा मुलगा राजिव यांनी वडिलांसाठी स्वतः रक्तदान केलं. आज पुन्हा रक्ताची गरज होती वेळेवर रुग्णासाठी रक्तदान करण्यासाठी तुम्ही तयार झाल्यामुळे आकाशदादा कोडाने तुमचे मनःपूर्वक आभार...!


प्रफुल भोयर ( मुकुटबन )

यवतमाळ जिल्हा रक्तपेढी गृप

      7057586468


🩸🩸🩸🩸🩸🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

18 December 2020

तब्बल 65 रक्तविरांनी केलं रक्तदान...

ब्बल 65 रक्तविरांनी केलं रक्तदान...


                         थेंब हा रक्ताचा🩸
                     आधार बनेल रुग्णांचा
   शेलू वासियांचे अनंत आभार तुम्ही 65 रक्तदाते देऊन मानवतेचा सन्मान केला आहे.
      श्री वसंतराव नाईक शासकीय रक्तपेढी टीम च्या अमुल्य योगदानातून शिबिर संपन्न झाले.

प्रफुल भोयर ( मुकुटबन )
यवतमाळ जिल्हा रक्तपेढी ग्रुप
7057586468

🩸🩸🩸🙏🏻🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳🇮🇳




13 December 2020

मानवतेच्या सर्वोच्च सेवेसाठी रक्तदान करा...


मानवतेच्या सर्वोच्च सेवेसाठी रक्तदान करा.

तिनमित्रांची गरजूंना मदत – एकाच वेळी केलं रक्तदान.

          कुणी रक्तदेता का रक्त ? रुग्ण नातेवाईकांच्या या केविलवाण्या प्रश्नाने बघणाऱ्यांचं किंवा ऐकणाऱ्यांचं मन हेळावून टाकत असते. रक्तासाठी मानवाला मानवावरच अवलंबून राहावं लागते.
         रक्त तयार करण्याचा ना कुठला कारखाना असतो ना कुठली प्रयोगशाळा, रक्ततयार करण्यासाठी फक्त एकच आश्चर्यजनक कारखाना आहे, तो म्हणजे मानवी शरीर. मोटिव्हेशन आपल्या जीवनातील चैतन्य आहे. स्वयंप्रेरणाच दिर्घकाळ टिकू शकत असल्याने प्रेरणेचे रूपांतर स्वयंप्रेरणेने होण्यासाठी रक्तदान चळवळीविषयी आस्था बाळगणाऱ्यांनी सातत्याने यासाठी प्रयत्न केले पाहिजे. वर्तमानपत्रात यवतमाळ रक्त पिढी मध्ये अत्यल्प रक्ताचा साठा असल्याचे वृत्त मंगेश शेटे (सेक्शन ऑफिसर, के.व्ही.के., पी.के.व्ही.,यवतमाळ)यांनी वाचले.
         लगेच मंगेश नी रक्तदान चळवळीविषयी आस्था बाळगणाऱ्यापैकी , एकमेकांचे जिवलग मित्र, जे वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या पदावर सेवा देत आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र येऊन स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याची परंपरा चालवत आहे, यांना रक्तदान करण्यास जाऊ असे सांगितले .
         ठरल्याप्रमाणे ते तिघे प्रभाकर रामराव पांडे, (गट विकास अधिकारी, पंचायत समिती, मारेगाव ), अभिजित राऊत, (वरीष्ठ सहायक, जलसंपदा विभाग, यवतमाळ), निलेश क्षिरसागर,(जी.एस.टी. ऑफीसर, यवतमाळ)
यांनी आज श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी विभाग यवतमाळ येथे स्वैच्छिक रक्तदान केलं आणि रक्तदान चळवळीचा एक अमूल्य हिस्सा असल्याचा दाखला दिला.
        तरुणांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य, रक्तदात्याइतकेच महत्व व आवश्यकता रक्तदान प्रबोधनाला आहे. रक्तदान चळवळ सामाजिक स्तरावर अनेक प्रकारे विकसित होणे गरजेचे आहे, यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या प्रफुल भोयरला हा तिघांनी मानवतेच्या हितासाठी घेतलेला गौरवास्पद निर्णय एक ऊर्जा देणारा मार्ग ठरेल, यात शंका नाही.
        मानवी रक्ताची गरज कधीही न संपणारी असल्याने रक्तदान चळवळीत समाजातील प्रत्येक व्यक्ती अनिवार्य होणे गरजेचे आहे. तुमच्या सामूहिक रक्तदानाने प्रत्येकात रक्तदानाची प्रेरणा चिरकाळ टिकेल.




12 December 2020

रक्तदान म्हणजे मानवतेला वंदन होय...



रक्तदान म्हणजे मानवतेला वंदन होय, हे जनसामान्यांत रुजेल.
                     ✍🏻 प्रफुल भोयर
                      7057586468
                        🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

06 December 2020

Happy Birthday Pranita Tai🎂💐


#HappyBirthdayप्रणिताताई🎂💐💐

★★★जीवनाला कारण आलं★★★

स्वप्न बघणारी माझी ताई 
आज सत्यात उतरली 
रोवून जमिनीवर घट्ट पाय
आभाळ पेलण्या सज्ज झाली।। 
आव्हानांना पेलत आहे 
समतेची धरुनी कास 
प्रगल्भ प्रज्ञा दुरदूरष्टीची 
शोभे तिच्या हाती पताका खास।। 
उत्कर्षासाठी ही कर्तृत्व कर तू
माझी ताई सांगते मला
तळमळ तुझ्या हृदयातील बघून नाभतून वीजही खुनवती तुला।। 
कर्मवीर हो संघर्षातुन
भावनेहून कर्तव्य थोर जान
सोज्वळ सफल  जीवनासाठी कर स्वयंम अस्तित्व तयार।। सांगत असते नेहमीच ती 
घे निर्धाराची मशाल 
भान ठेवून उन्नतीचे
घाट धैर्य तुझे विशाल।।
प्रेमाच्या जिव्हाळ्याने 
वाट आमची पाहते 
हुंकार भरल्या अंतकरणातून 
माया ओथंबून वाहते।।
भावंडांच्या भल्यासाठीचा
अट्टहास नेहमीच मांडते 
लहान बहीण भाऊ मात्र 
तिच्याच खोड्या काढते ।।
धरते मायेची सावली 
जशी दुसरी आमची माऊली
वात्सल्या पुढे तिच्या 
आमचे आकाश  ठेंगणे झाले।।
स्वर्गाचाही नाही वाटणार 
तितका हेवा मनात दाटतो 
सुखासाठी माझ्या ताईच्या चंद्र तोडून द्यावा वाटतो ।।
अश्रू दाटले डोळ्यामध्ये 
कोपऱ्यात जाऊन रडते
एक पंख तुटलेला पाहता
तिचं व्याकुळ मन तुटते।।
आस लागली मनाला 
भाऊ माझा दुरुन गाडीनं येईन मखमलीचा सुंदर झगा 
मला घेऊन देईल।।
कळून चुकले मला 
आमच्यासाठी ती मनोमन झुरते संस्कार देऊन आम्हाला
ती समृद्धी कडे नेते ।।
सरळ साधं जगन आपलं 
त्यात वरदान मला मिळालं
भाऊ-बहिणीच्या सामर्थ्याने माझ्या जगण्याला कारण आलं.                               ✍🏻 प्रफुल भोयर
                                         7057586468
                                          06/12/2018

माझ्या मोठ्या ताई ला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂💐♥️

माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂💐♥️

         "कस जमत यार तुला हे सगळं." कॉलेज व्यतिरिक्त बाकी सगळं बघणं, ही माझ्या तर जमेची बाजू नाही. साधं स्वतःच करून घ्यायलाच नाकी नऊ येतात माझ्या. तुझ्यासारख अष्टपैलू होणं म्हणजे कसोटीच. तुझं मात्र बर हं! कॉलेज, नोकरी, नातेवाईक, मैत्रिणी, कुटुंब या सगळ्यांना, कुणाचीही मन न दुखावता हँडल करता येतेे तूला.कौशल्यच बर का तुझं हे. "किती सोशिक आहेस तू?" एक झाल्यावर दुसरं दुसरं झाल्यावर तिसरं असे एक ना अनेक प्रोब्लेमची मालिका आपल्या समोर दिसताना तू मागे वळली नाही. आईच्या भक्कम आधारावर स्पर्धेच्या युगात टिकून आहेस.  नाही तर तुझ्याच मैत्रिणी बघ ना निम्म्यापेक्षा जास्त संसाराला लागल्या. ते काहीही असो पण हिमतीला सलाम हं तुझ्या! कोणत्याही बाजूने तुझा विचार केला तरी You are so Great कुणीतरी पेरून ठेवलेले तुझ्या वाटेतले काटे तू स्वतः वेचत स्वतःच अस्तित्त्व तयार केलं तेही शून्यातून. आपल्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन गरिबीच्या अंधारात गुरफटलेले माझे बहीण-भाऊ कसे पुढे निघेल याचाच विचार तू केलास. आज मी जे काई आहे याचं खरं श्रेय आईनंतर तुलाच जाते. मोठी बहीण म्हणून या सर्व भूमिका लीलया पेलताना होणारी तुझी दमछाक मला कधिच कळली नाही. त्याचमुळे असेल कदाचित मी कधीच तुझा विचार केला नाही. समजदार, शांत,सोज्वळ, प्रेमळ आहेस तू.तुझं महत्व आमच्या आयुष्यात खूप मोठं आहे. हे खुशमतीसाठी नाही तर माझ्या प्रत्येक शब्दात तुझीच माया आहे. या जन्मदिनी परमेश्वराजवळ एकच मागणं तू  सदैव सुखी असावं.
💐💐Wish you a Very Happy Birthday Pranita Tai💐💐💐
🎂🎂🎂💐 🎂🎂🎂
        ✍🏻 - प्रविणा भोयर (मुकुटबन)
                      06/12/2020


22 November 2020

सालोड येथे पार पडलं भव्य रक्तदान शिबिर....

 #रक्तदान_महादान ♥️

सालोड येथे पार पडलं भव्य रक्तदान शिबिर....



दिनांक 23/11/2020 ला शाहिद आदिवासी गोवारी समाज स्मृती दिनाचे औचित्य साधून सालोड येथे काल रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
३५ रक्तदात्यांनी रक्तदान केलं, रक्तसंकलनासाठी श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ रक्तपेढी विभागाचे मोलाचे सहकार्य मिळाले.
शिबिराचे आयोजन कर्ते मा. सचिन चचाणे, राम शेंद्रे व समस्त गावकरी यांच्यामुळे हे शिबीर यशस्वी झाले.
        #रक्तविर_बहुउद्देशिय_संस्था चे प्रफुल भोयर , यशवंत गिरी, सुनिल नलगंटीवार, मोनेश्वर खंडारे, विशाल जाधव यांनी यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य दिले.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
प्रफुल्ल भोयर यवतमाळ
रक्तविर बहुउद्देशीय संस्था
7057586468






15 November 2020

आज दिवाळीत सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या माझ्या मित्रास ही कविता...

आज दिवाळीत सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या माझ्या मित्रास ही कविता....

तुझी दिवाळी...
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
💫💫✨✨💫💫
तुझी दिवाळी 
आम्ही सगळे आनंदात
दिवाळी साजरी करतोय
जीव धोक्यात घालून
तू सीमेवर लढतोय।।

तिमिराचा विनाश करण्या
लक्ष्य पणत्या लावतोय
तिरंगा फडकतोय डौलाने
 तू अभिमानाने सांगतोय।।

तुमच्या त्यागाने आपण 
सुखात दिवस काढतोय
 मिळून करू दिवाळी 
ये तुझी वाट पाहतोय।।
       ✍🏻- प्रफुल भोयर
         7057586468

13 November 2020

एक जीव वाचला...❣️


एक जीव वाचला....❣

🇮🇳💉_________/\_______💉🇮🇳
स्वतःसाठी जगता जगता
जगत आहे दुसऱ्यांसाठी
मोह मायेच्या पसाऱ्यात
रक्तदान केलं इतरांसाठी
उपकार मानू कसे मी
शब्द मजपाशी नाही
आयुष्यात तुमच्या रूपाने
देव डोकावून पाही.
धर्म-पंत-जाती पलीकडे
साऱ्यांच्या अल्याड
रक्तमासाच्या पल्याड
सुंदर नातं माणुसकीचं
कर्तव्यतत्पर तुम्ही
जनसेवेत गुंतला
अमूल्य दानाने तुमच्या
एक जीव वाचला...
                  ✍🏻 प्रफुल भोयर (मुकुटबन)
                 Mo. No:- 7057586468🇮🇳💉

आली दिवाळी......✨💫🎉

आली दिवाळी...💫✨

आज माझ्या दिवसाची 
आनंदाने सुरुवात झाली
मंगलदायी दिवाळी ही 
भाग्य घेऊन आली।।

रेखाटली स्वागतास अंगणी
रांगोळी ही वाटे मोती
लक्ष्य दिव्यांची आरास
लख्ख उजळल्या ज्योती।।

अखंड उधळण सुखाची 
ही कंदिलाची रोषणाई
मांगल्याचे बांधून तोरण
प्रकाशमय चैतन्यदायी।।

आकांक्षाचे वाहे वारे
प्रसन्न करुनी सोनसकाळी
अंधाराचा विनाश करण्या
समृद्धीची आली दिवाळी।।
            ✍🏻- प्रफुल भोयर मुकूटबन
                        7057586468

03 October 2020

उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा भास्कर...! 🎂💐🎊🇮🇳

सलाम तुझ्या निश्चयाला
प्रखर तुझे तेज भास्करा।।
उत्साह ध्येयाने भारुन
पोहोचलास तू यश शिखरा ।।

          महाराष्ट्रातले बरेच तरुण बघतात, तसच एक स्वप्न त्यानही बघितलं. खाच-खडग्यातून वाट काढत जीवनाच्या परीक्षेत उतरताना याची जाणीव ही नव्हती की आपणही आपल्या ध्येयात यशस्वी होऊ. पण त्याच्या प्रयत्नाची पराकाष्ठा त्याला यशापर्यत घेऊन गेली. मेहनतीच्या जोरावर भारतीय सेनेत भरती होणारा भास्कर ठाकरे वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी देशसेवेसाठी सज्ज झाला.
          भास्कर माझा जिगरी दोस्त, सोबतच शिकलो त्यामुळे एकमेकांना जाणून घेण्यासाठी वेगळ काहीही करावं लागलं नाही. एकाच बेंचवर बसून आमचे College चे दिवस गेले. अभ्यासातही आमच्यापैकी कोणी पुढे मागे नव्हते. काँपिटीशनच्याही भानगडीत आम्ही कधी पडलो नाही. एक समंजस व पवित्र मैत्रीने आम्हाला सदैव जोडूनच ठेवलं. भास्कर लहानपणापासूनच हुशार मुलगा. गरिबीतूनच शिक्षण घेतलं. कष्टाच्या दिवसातही खचून न जाता आपल्या कुटुंबाचा आधार बनला. नकारात्मकता त्याच्या मध्ये कधी दिसलीच नाही. तो नेहमी आनंदी असतो. भास्कर जिथे कुठे जाईल तिथे त्याच्या येण्यान वातावरण अगदीच ताजतवाण होऊन जाते. मित्रांचा लाडका भास्कर स्वभावाने प्रेमळ व कणवाळू आहे. अतिशय उत्कृष्ठ असा वक्तृत्व गुण त्याच्यामध्ये आहे. त्याच्या ओघवत्या भाषण शैलीने कॉलेजमध्ये सर्वांच्या मनावर राज्य करायचा. मित्रांच्या अडचणी सोडवण्यात एकदम पटाईत असणारा भास्कर आज स्वतःला देशसेवेत अर्पण करीत आहे. आपण कुणाच्या तरी कामी यावे असं तो माझ्याजवळ नेहमीच म्हणायचा. म्हणून त्याने कॉलेज काळातच रक्तदान करणे सुध्दा चालू केलं तेही स्वैच्छिक. स्वतःपेक्षा इतरांचा विचार करणारा भास्कर भारतीय नागरिकांचा संरक्षक म्हणून जगेल, यापेक्षा दुसरा अभिमान कोणता असेल ?
मेहनत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तू जे काही करतो आहेस ते योग्यच आहे.
( जीवनाच्या प्रत्येक क्षणी तू यशस्वी व्हावा, आनंदीत असावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना. )

✍🏻 प्रफुल्ल भोयर (मुकुटबन)
         7057586468
          04/10/2020

20 September 2020

रक्तविर ने गाठला माणुसकिचा पल्ला..

 रक्तविर ने गाठला माणुसकिचा पल्ला... 



  • रक्तविरचे ७ व्या वर्षात पदार्पण, ऑनलाइन स्नेहसंमेलन
यवतमाळ:- रक्त म्हणजे मानवी शरिरातील सर्वात महत्वाचा घटक म्हणुन ओळखले जाते. दैनंदिन जिवनामध्ये रक्ताची गरज हि देशपातळीवर खुप मोठ्या प्रमाणात आहे. कधि गर्भवती महिला, अपघाती रूग्ण, ऑपरेशन, मलेरिया डेंग्यु इत्यादी अशा आजारांना रक्ताची दैनंदिन गरज पडते. तर सातत्याने नियमित दर तिन महिण्याला थैलेसिमीया सिकलसेल च्या आजाराने ग्रस्त असणाऱ्या रूग्णाला रक्ताची गरज पडते. अपघात व गर्भवती च्या रूग्णाकरीता तात्काळ रक्ताची गरज भासते. तर कधि कधि रक्ताचा साठा कमि असतो व अशा वेळी रक्तदाता शोधण्याची गरज पडते. हिच गरजु गरीब रूग्णाकरीता रक्ताची उपलब्धता करून देण्याचे कार्य रक्तविर बहुउद्देशीय संस्था करीत आहे. व्हाट्सएप, फेसबुक, इमेल, टेलेग्राम, इंस्टाग्राम च्या सोशल मिडिया चा वापर करून कविता, लेख, प्रेरणादायी संदेश च्या सहाय्याने जनजागृती करून रक्तदाते जुडवित आहे. तात्काळ रक्त‌ मिळाल्यास रक्ताअभावी जाणाऱ्या जिवाला आपण नवीन जिवन देऊ शकतो. रक्ताची गरज आहे असे म्हटले कि कशाचाही विचार न करता रक्तदाते तसेच रक्ताची पिशवी उपलब्ध करून देत आहे. जिल्हाभरातच नाही तर अवघ्या महाराष्ट्रसह संपूर्ण भारतभर कुठेही रक्ताची असलेली आवश्यक गरज पुर्ण करते. मोबाइल मधील असलेल्या सोशल मिडिया चा योग्य वापर करीत रक्ताची चळचळ सुरू करून इतरञ सहकारी मंडळीसह रक्ताची साखळी जोळुन ठेवली आहे. जिवनातील सर्वात दुर्मीळ असा बॉम्बे ब्लड गृप च्या रक्ताची देखील यांच्यामार्फत उपलब्धता होते. एकाच्या रक्तदानामुळे चार गरजु रूग्णाचे प्राण वाचविता येते. मदत करायची असेल तर अत्यंत आवश्यक गरजु रूग्णाला मोफत रक्तपुरवठा व औषधोपचार तसेच त्या रूग्णाला सहाकार्य करून त्याची काळजी देखील घेतली जाते. असे अतुलनिय कार्य करीत असणाऱ्या रक्तविर बहुउद्देशीय संस्था यांनी रक्तगट तपासणी, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर, शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप, शालेय विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम, नेञतपासणी, अनाथ व अपंग बालकांना मदतीचा हात, गरजु रूग्णाला आरोग्य विषयक आर्थिक मदत, वृक्षारोपन, रक्तदानाविषयी जनजागृती, शेतीविषयक मार्गदर्शन कार्यक्रम, रक्तविरांचा सत्कार समारंभ, पञकार परिषद, बालसंगोपनाकरीता मार्गदर्शनपर मदतिचा हात, ग्रामस्तरीय सक्षमीकरणाचा सप्ताह, प्लाज्मा डोनेशन विषयी जनजागृती इत्यादि प्रकारची उपक्रमे पार पाडत आहे. 
यांच्या अशा या अतुलनीय कार्याची दखल घेऊन रक्ताचे नाते ट्रस्ट पुणे, ह्युमन सोशल फाउंडेशन हनुमानगढ़, सोच ब्लड गृप इंदौर, रक्तदाता टिम उज्जैन, ब्लड हेल्पलाईन ‌जम्मु‌कश्मीर टिम, रेड क्रॉस सोसायटी हैद्राबाद, ह्युमन रिस्पॉन्सीबीलिटी तेलंगाना आंध्रप्रदेश, सुभाषचन्द्र बोस रक्तदान समिती सेंधवा मध्यप्रदेश, इत्यादी राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय पुरस्कार ने सम्मानित करण्यात आले आहे. रक्तविर बहुउद्देशीय संस्था हि सोशल मिडिया मार्फत डिजिटल रक्तसेवा जमीनपातळीवर रक्ताचे अतुलनिय कार्य अविरतपने निस्वार्थ करीत आहे. रक्तविर बहुउद्देशीय संस्था सोबत रक्ताच्या चळवळी मधुन निर्माण झालेल्या अनेक संस्था जुळुन कार्यरत आहे. आज संपूर्ण जगावर कोवीड १९ ने कहर केला आहे. दिवसेंदिवस कोवीड रूग्णांची संख्या वाढत आहे. तरीसुद्धा या अशा परिस्थिति मध्ये देखील रक्तपुरवठा करण्याचे हे कार्य अविरतपणे सुरू आहे. या संस्थेचा सहावा वर्धपानदिन साजरा करण्यात आला. या संस्थेमार्फत आपल्या तालुक्यातील प्रियल पथाडे, प्रफुल भोयर, गणेश मुद्दमवार तसेच निखील‌ धबडगे, यशवंत गिरी, सुनील नलगंटीवार, मोनेश्वर खंडारे, हेमराज गिते, विशाल जाधव, अभिषेक ठाकुर, गोकुल जुमनाके, सागर ईळकर, स्वप्नील अलगदेवे, राहुल कुरझडकर, भुषण फरांडे, शुभम निपाने, तसेच युवक व युवती कार्य‌ करीत आहे.



19 August 2020

रक्तदानाने कित्येकांना मिळाले जीवनदान

युवकांची सामाजिक बांधिलकी - रक्तमित्रांचा स्तुत्य उपक्रम



आजच्या स्थितीत विचार करता, सोशल मीडियामुळे मानवी जीवनच बदलत आहे. कधी चांगले तर कधी वाईट असे अनुभव नित्य ऐकायला मिळतात. तर एकीकडे सोशल मिडीयाचा वापर समाजहितासाठी केला जात आहे. माणसातली खरी माणुसकी तेव्हाच दिसते. जेव्हा वादळ, भुकंप, त्सुनामी, साथरोग  या सारखे संकट येते. आज संपुर्ण जगावर Covid-19 ने कहर केला आहे. दिवसेंदिवस रुग्णाची संख्या वाढत आहे. कोरोना ही भयंकर साथ रोखण्यासाठी सर्वत्र संचार बंदी आहे. लोकांच्या मनात भीती पसरली आहे. त्या ही परिस्थितीत रक्तविर बहुउद्देशीय संस्थेने कित्येक रुग्णांना जीवनदान दिले आहे. नकार देणारेही रक्तदाते होकारात बदलवले आहे. ही संस्था कुठल्याही शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या गरजु रुग्णाला अविरत रक्त पुरवठा करण्याचे काम करत आहे. रक्ताची गरज आहे म्हटलं की कशाचाच विचार न करता रक्ताची बॅग उपलब्ध करुन देत आहे. त्यांच्या या कार्याने आज पर्यत कित्येकांना मोफत रक्ताचा पुरवठा झाला आहे. रुग्णांचे प्राण वाचुन रुग्णांना नवीन आयुष्य मिळत आहे. आता ही संस्था फक्त जिल्हाभरातच नाही तर संपूर्ण भारताभर कुठेही रक्ताची असलेली गरज पूर्ण करते व रक्ताविना होणारी जीवाची हानी रोखणे या संकल्पनेने कार्य करते. यातील युवक सामाजिक बांधिलकी जपून जनजागृती करत आहे. हे एक देशहिताचे कार्य करीत आहे. रक्तदात्यांनी शासकीय रक्तपेढी ला रक्तदान करण्याचे अवाहन रक्तविर बहुउद्देशीय संस्था तर्फे  निखिल धबाडगे, अजय गावंडे,गणेश मुद्दमवार, प्रियल पथाडे, यशवंत गिरी, मोनेश्वर खंडारे,सुनील नलगंटीवार, हेमराज गीते आणि प्रफुल भोयर कार्य करीत आहे.


15 August 2020

Slogans Of Blood Donation

Solgans Of Blood Donation

1) मला माझा अभिमान आहे,
मी नियमित Blood Donor आहे.

2)जन्मदिनी मी रक्तदाता झालो,
दोन जीवांच्या कामी आलो.

3)जगण्याचा आनंद घेईल,
मी रुग्णाला जीवन देईल.

4)थेंब थेंब साठवूया,
जीवन वाचवूया.

5)माझं रक्त कुणाचा तरी जीव वाचवेल.

6) देह माझा मासाचा,
ध्यास घेईल अवयवदानाचा....

    ✍🏻 -प्रफुल्ल भोयर (यवतमाळ)
                  7057586468

08 August 2020

रक्ताला कुठलीच जात नी भाषा...रक्तदान करते जगण्याची आशा...🩸🇮🇳


🩸🩸🩸🩸🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्तविर बहुउद्देशीय संस्थे तर्फे मोफत रक्तपुरवठा.....
🙏🏻🇮🇳

19 July 2020

महेश दादांच्या कार्यानं रक्त बोलु लागलं !

रक्त बोलु लागलं!

पुसले जाईल अश्रु
माणुसकीच्या संदेशात ।
रक्ताने जीव वाचेल
रक्तविरांच्या देशात ।।
         
      रक्तदानामुळे धोका काही नसला तरीही साधी प्रक्रिया नाही. रक्तदानासाठी व ती मानसिकता तयार करण्यासाठी जिगर लागते. ते निर्माण करण्याच खरं काम महेशदादांनी केलंय. रक्तदानातून माणुसकीची शीव गाठून खरी खुरी ईश्वर सेवा होत असल्याची जाणीव महेश दादा व त्यांच्या वडिलांच्या कार्याने करुन दिली. 
          जीवदानाचे उरी घेतलेले ब्रीद चालवीत रक्ताची मोठी श्रुंखला तयार केली. या तयार झालेल्या रक्तवीरांच्या देशातलं 35 व रक्तदान महेश दादांची परोपकारी व दातृत्वच होय. कित्येकाच्या हृदयातून आज बोलतं झालेलं रक्त ही रक्तदान क्षेत्रातील सर्वात मोठी प्रेरणा आहे.

Salute Our Work Mahesh Dada
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

                ✍-प्रफुल भोयर
               7057586468

25 June 2020

मनोगत - महामारी कोरोनातून बरा होणाऱ्या रुग्णाची...


मनोगत - महामारी कोरोनातून बरा होणाऱ्या रुग्णाची
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

वाटले नव्हते कधीच
अशीही लाट येईल
एकेक करत प्रदेश
व्यापुन सर्व घेईल।।

रुग्ण वाढीची तीव्रता
पार शिगेला पोचली
हिमालयाने तर सॅनिटर
आपल्या माथ्यालाचं खोचली।।

कळले होते मला
मरणाच्या वाटेत पडलो
माणुसकीचा पहिला धडा
मी येथूनच शिकलो।।

डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी
यांच्या सेवेने वाचलो
विलगिकरण पूर्ण करुन
थेट घरी पोचलो।।

कोरोनाच्या भीतीनं
कावरा बावरा झालो
मी स्वतःच जवळून
मृत्यू पाहून आलो।।

मग कळले मला
रुग्ण बरा होते
प्रतिकारशक्ती सुदृढतेने
अंगातला विषाणू मरते।।

महत्त्व जाणुन श्वासाचे
मी नव्याने घडलो
ऋण फेडण्या म्हणून
समाजसेवेस वळलो।।

घडली नाही सेवा
माझ्या हातून काही
रक्तातल्या प्लाझ्मा ला
दुसरा उपाय नाही।।

आज जगातलं मौल्यवान
दान देऊन आलो
रक्तामधून मी रुग्णाला
प्राण देऊन आलो।।

        ✍प्रफुल भोयर (यवतमाळ )
              7057586468

दैनिक विदर्भ मतदार वृत्तपत्रात प्रकाशित


लॉकडाऊन मध्येही रक्तदानासाठी युवकांचा प्रतिसाद...

दैनिक लोकमत आणि पुण्यनगरी


 



24 June 2020

दातृत्व एका रक्तविराचे 🙏🇮🇳

#दातृत्व_एका_रक्तविराचे.....!❣

#स्वतःच्या #जन्मदिनी #स्मिताताईना_दिले #अनोखी_भेट....🇮🇳

ऐ #रक्तविर तु जिंदा है....!❣🇮🇳

#रक्तदाते - रक्तविर #स्वप्निलभाऊ_अलगदेवे🙏🏻
     समाजाचा विकास परत नवी पहाट घेऊन उदयास यावा यासाठी अनेक प्रामाणिक युवक राजकारणात उतरत आहे... असेच राजकारणात कार्य करताना रक्तदान क्षेञात जुळून समाजकार्य करणारे स्वप्नील भाऊ अलगदेवे राजकारण व समाजकारण या दोन्हीचे पाञ निभावत आहे. राजकारणातुन जेवढे नाही करता येत तेवढे रक्तदान सारख्या समाजकार्यातुन करता येते... रक्ताअभावी एखाद्याचा जिव जाऊ शकतो... पैसा, अश्रृ हे जिवन देऊ शकत नाही... तर ते केवळ रक्तदानच जिवनदान देऊ शकते... चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे रक्तदानाची चळवळ उभारुन पाऊल टाकत कित्येक गरजु गरीब रूग्णाला रक्तदाते किंवा मोफत रक्त उपलब्ध करून देण्याचं काम स्वप्नीलभाऊ करत आहे... 
        संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान चळवळींचा हातभार सांभाळीत गरजु महिला तसेच अपघाती रूग्ण, थैलेसिमीया,सिकलसेल, Emergency Patient इत्यादींसाठी रक्तदाते, रक्त स्वप्नीलभाऊ उपलब्ध करून देत आहे... एकिकडे युगात रक्ताचं नातं कामी येत नाही... व दुसरीकडे स्वप्नीलभाऊ अशी मूल्यवान जिंदगी इतरांना देत आहे... स्वताच्या मोबाईल चा वापर करून मिञमंडळी चे सर्कल बनवुन रक्तदानाची चळवळ स्वप्नीलभाऊ चंद्रपुर  जिल्हा तसेच इतरञ जिल्ह्यात जुळून चालवित आहे... रक्तदान क्षेञात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल  स्वप्नीलभाऊ यांना मध्यप्रदेश& इतर पुरस्काराने  गौरविण्यात आले आहे.. 
        गेली काही दिवसातच स्वप्नीलभाऊ यांनी जवळपास शेकडो गर्भवती महिला रूग्ण यांना रक्त उपलब्ध करून  नवीन जिवनाची आशादायी किरणं उजळुन दिली... स्वप्नीलभाऊ हे खरच एक युवकांस प्रेरणा देत जिवनाची पाऊलवाट सिद्ध करीत असताना रक्ताची किंमत हि जिवनाच्या किमती बरोबर असते हि जाणीव अंगी बाळगुण आज स्वप्नीलभाऊ यांनी ब्रम्हपुरी मध्ये दवाखान्यात भरती असलेल्या सिकलसेल रूग्ण  स्मिता पाटिल करीता स्वतः AB+ रक्तदान करून त्या रूग्णाला जिवनदानाची मदत केली... अशाच या प्रेरणास्थान असलेल्या युवकास वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.....!

  -प्रफुल भोयर
 #रक्तविर_बहुउद्देशीय_संस्था, महाराष्ट्र
7057586468
❤🇮🇳

21 June 2020

Slogans Of Blood Donation

Slogans Of Blood Donoation 🙏🏻🇮🇳

१) रक्तदानातून जपुया हित
 बनवून ऐच्छिक दानाची रीत।।

२) रक्तदानाची नैतिक जबाबदारी
सदिच्छेची मिळवा शिदोरी।।

३)रक्तदान किरण आशेचा
क्षण जाई निराशेचा।।

४) करा रक्तदानाची बात
महामारीत ठरेल मदतीचा हात।।

५) रक्तदानास घ्या मनावर
अपाय नाही तनावर

६) रक्ताचा थेंब वरदान ठरेल
विविध रुग्णास बरा करेल।।

७)मनी रक्तदानाचे बीज वसेल
रुग्ण जीवनाची घडी बसेल।।

८) रक्तदानाची निरपेक्ष भावना
आयुष्य बळकटीची आहे कामना।।

९) रक्तदानाने करु वार
कोरोना होईल हद्दपार।।

१०) रुग्णांची वाढेल प्रतिकारशक्ती
रक्तदानच खरी ईश्वर भक्ती।।

११) बरें झालेल्यांनो करा पारख
रक्तदानाने बनवा नवी ओळख।।

१२) बरे झालेल्यांनो रक्तदानाचे घ्या मनी जरा
प्लाझ्मा ने कोरोना पेशंट होतो बरा।।

         ✍- प्रफुल भोयर
          7057586468

08 June 2020

संयमी मनाचा SuperCops...

#संयमी_मनाचा #Super_Cops. 🇮🇳



      #पोलिस हे केवळ शब्द नसून आपले #धैर्य वाढवणारी ऊर्जा आहे.
      रक्ताचा तुटवडा त्यात जगावर कोरोना च संकट अश्यात माणसांचा माणसांकडे पाहण्याचा  बदललेला दृष्टिकोन अन मनातली #रक्तदानाविषयीची भीती त्यामुळे सामान्य मनाचा माणूस रक्तदानास सहसा धजावत नाहिए. पण #पोलिस एकमेव आहे जो सर्व ऋतूत, सर्व संकटात, सर्व सुखदुःखात जनतेच्या प्रत्यक्ष सोबत असतात. सेवा हाच धर्म मानून जिगरबाज पोलिस #कमांडो रक्तविर #लोकेश_मसराम व #ऋषी_चव्हाण (Maharashtra Police) या दोघांनी आपलं रक्त दिल आणि रक्ताविना मरणाच्या दारात उभी असलेली #निकिता_सहारे यांना बाहेर काढले.
       #जिल्हा_शासकीय रुग्णालयात ( #SVNGMC Blood Bank Yavatmal ) निकिता हिला B+ Positive रक्ताची गरज होती. #महाराष्ट्र_पोलिस कमांडो हेमराजदादा गीते, सुनिल नलगंटीवार, लोकेश मसराम, यशवंत गिरी, मोनेश्वर खंडारे, सागर सातपेशे व प्रफुल भोयर (मुकुटबन) यांनी विशेष धावपळ करून रक्त मिळवून देण्यास मोलाचे प्रयत्न केले व निकिताला जीवनदान दिले.
       आज पुन्हा एकदा पोलिस जवानांच्या हाताने मानवतेचे दर्शन घडले हेच कार्य #युवकांसाठी_प्रेरणादायी आहे.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

★★ इंसानियत★★
हालात ने हमे
कहा लाया
जहा नहीं पड़ता
सूरज का साया।।

हम तो बस
अपनो के लिए जीते है
कभी भी देखो
पराये काम आते है।।

वक्त ने भी बड़ा
काम है किया
इंसान ने इंसान से
एहसान पाया।।

सोचो खून के
रिश्तो में क्या पड़ा
सब रिश्तो में रिश्ता
इंसानियत का ही बड़ा।।
        ✍🏻 - प्रफुल भोयर
              7057586468

प्रफुल भोयर
#रक्तविर_बहुउद्देशीय_संस्था 🙏🏻
#यवतमाळ_जिल्हा_रक्तपेढी ग्रुप
#Bravery_Raktveer 😊
7057586468

01 June 2020

RAKTVEER

       माणसातली खरी माणुसकी तेव्हाच दिसते. जेव्हा वादळ, भुकंप, त्सुनामी, साथरोग  या सारखे संकट येते. आज संपुर्ण जगात Covid-19 ने कहर केला आहे. दिवसेंदिवस रुग्णाची संख्या वाढत आहे. कोरोना ही भयंकर साथ रोखण्यासाठी सर्वत्र संचार बंदी आहे. लोकांच्या मनात भीती पसरली आहे. त्या ही परिस्थितीत रक्तविर बहुउद्देशीय संस्थेने कित्येक रुग्णांना जीवनदान दिले आहे. नकार देणारेही रक्तदाते होकारात बदलवले आहे. सुरवातीपासून आपल्या सेवेमध्ये रक्तविराने कधीच मागे वळून पाहिले नाही.नेहमी जीव वाचविण्यासाठी तत्पर राहिले.

- #PrafulBhoyar
#Bravery_Raktveer 😊
7057586468

22 May 2020

परेश दादांनी जिल्हा शासकीय रक्तपेढी ला केलं रक्तदान....

💉💉💉💉💉💉💉💉

जाना चाहते हो अगर
किसीं के दिल में
तो एक ही रास्ता है
"#रक्तदान"

      नित्य रक्तदान करुन आमचे परेश दादा बुटे महान दानशूर ठरले आहे. रिक्त हस्तानेही देण्यासारखी एक गोष्ट मानवाकडे आहे ते म्हणजे Blood  जे दान दिल्याने कुणाचा तरी जीव वाचतो, कुणाच्या तरी हृदयात जागा मिळते. दादा तुम्ही आयुष्यात कितीतरी हृदयात जागा मिळवली आहे. तुमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाला सलाम.

- प्रफुल भोयर
7057586468
#Bravery_Raktveer

04 March 2020

मोनेश्वर_खंडारे ठरला वर्दीतील देवदूत🙏🇮🇳

 #मोनेश्वर_खंडारे ठरला वर्दीतील देवदूत🙏🇮🇳 

       मदतीची सर्व दारे जेव्हा बंद होतात तेव्हा महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तव्याचे सर्व दारे सताड उघडली जातात.  यवतमाळ जिल्यातील यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात भर्ती असलेले अमोल गिरी यांना तातडीने रक्ताची गरज होती. 

       सर्वत्र रक्ताची मागणी केली, रक्तदात्यांचा शोध घेतला पण रक्तदाता काही उपलब्ध होत नव्हता अशा चिंताग्रस्त वातावरणात #यवतमाळ_पोलीस मोनेश्वर खंडारे दादा यांनी आपल्या अमुल्य रक्ताचे दान करुन अमोल गिरी यांच्याशी रक्ताचं नातं जोडलं. यवतमाळ पोलिस सेवेतील अधिकारी कर्मचारी केव्हाही सेवेसाठी तत्पर असतात याची साक्ष दिली.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 

प्रफुल्ल भोयर

7057586468




29 February 2020

"भगीरथ 2020" साठी माझी विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात आली - प्रफुल भोयर

 माझी "भगीरथ" विशेष मानाच्या पुरस्कासाठी निवड केल्याबद्दल जेष्ठ नागरिक मंडळ, आम्ही यवतमाळकर फोरम, आणि डॉ. महाजन ट्रस्ट यांचे मनस्वी आभार...!

Thank you😊

🙏🏻🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳🇮🇳





19 February 2020

रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शिवजन्मोत्सव आयोजन समिती व संभाजी ब्रिगेड अडेगाव तर्फे सत्कार करण्यात आला.


 #रक्तदानक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल #शिवजन्मोत्सव_आयोजन_समिती व #संभाजी_ब्रिगेड #अडेगाव तर्फे सत्कार करण्यात आला. सर्वांचे मनःपुर्वक आभार...!

🙏🏻🇮🇳😘




कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...