युवकांची सामाजिक बांधिलकी - रक्तमित्रांचा स्तुत्य उपक्रम
आजच्या स्थितीत विचार करता, सोशल मीडियामुळे मानवी जीवनच बदलत आहे. कधी चांगले तर कधी वाईट असे अनुभव नित्य ऐकायला मिळतात. तर एकीकडे सोशल मिडीयाचा वापर समाजहितासाठी केला जात आहे. माणसातली खरी माणुसकी तेव्हाच दिसते. जेव्हा वादळ, भुकंप, त्सुनामी, साथरोग या सारखे संकट येते. आज संपुर्ण जगावर Covid-19 ने कहर केला आहे. दिवसेंदिवस रुग्णाची संख्या वाढत आहे. कोरोना ही भयंकर साथ रोखण्यासाठी सर्वत्र संचार बंदी आहे. लोकांच्या मनात भीती पसरली आहे. त्या ही परिस्थितीत रक्तविर बहुउद्देशीय संस्थेने कित्येक रुग्णांना जीवनदान दिले आहे. नकार देणारेही रक्तदाते होकारात बदलवले आहे. ही संस्था कुठल्याही शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या गरजु रुग्णाला अविरत रक्त पुरवठा करण्याचे काम करत आहे. रक्ताची गरज आहे म्हटलं की कशाचाच विचार न करता रक्ताची बॅग उपलब्ध करुन देत आहे. त्यांच्या या कार्याने आज पर्यत कित्येकांना मोफत रक्ताचा पुरवठा झाला आहे. रुग्णांचे प्राण वाचुन रुग्णांना नवीन आयुष्य मिळत आहे. आता ही संस्था फक्त जिल्हाभरातच नाही तर संपूर्ण भारताभर कुठेही रक्ताची असलेली गरज पूर्ण करते व रक्ताविना होणारी जीवाची हानी रोखणे या संकल्पनेने कार्य करते. यातील युवक सामाजिक बांधिलकी जपून जनजागृती करत आहे. हे एक देशहिताचे कार्य करीत आहे. रक्तदात्यांनी शासकीय रक्तपेढी ला रक्तदान करण्याचे अवाहन रक्तविर बहुउद्देशीय संस्था तर्फे निखिल धबाडगे, अजय गावंडे,गणेश मुद्दमवार, प्रियल पथाडे, यशवंत गिरी, मोनेश्वर खंडारे,सुनील नलगंटीवार, हेमराज गीते आणि प्रफुल भोयर कार्य करीत आहे.
No comments:
Post a Comment