माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂💐♥️
"कस जमत यार तुला हे सगळं." कॉलेज व्यतिरिक्त बाकी सगळं बघणं, ही माझ्या तर जमेची बाजू नाही. साधं स्वतःच करून घ्यायलाच नाकी नऊ येतात माझ्या. तुझ्यासारख अष्टपैलू होणं म्हणजे कसोटीच. तुझं मात्र बर हं! कॉलेज, नोकरी, नातेवाईक, मैत्रिणी, कुटुंब या सगळ्यांना, कुणाचीही मन न दुखावता हँडल करता येतेे तूला.कौशल्यच बर का तुझं हे. "किती सोशिक आहेस तू?" एक झाल्यावर दुसरं दुसरं झाल्यावर तिसरं असे एक ना अनेक प्रोब्लेमची मालिका आपल्या समोर दिसताना तू मागे वळली नाही. आईच्या भक्कम आधारावर स्पर्धेच्या युगात टिकून आहेस. नाही तर तुझ्याच मैत्रिणी बघ ना निम्म्यापेक्षा जास्त संसाराला लागल्या. ते काहीही असो पण हिमतीला सलाम हं तुझ्या! कोणत्याही बाजूने तुझा विचार केला तरी You are so Great कुणीतरी पेरून ठेवलेले तुझ्या वाटेतले काटे तू स्वतः वेचत स्वतःच अस्तित्त्व तयार केलं तेही शून्यातून. आपल्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन गरिबीच्या अंधारात गुरफटलेले माझे बहीण-भाऊ कसे पुढे निघेल याचाच विचार तू केलास. आज मी जे काई आहे याचं खरं श्रेय आईनंतर तुलाच जाते. मोठी बहीण म्हणून या सर्व भूमिका लीलया पेलताना होणारी तुझी दमछाक मला कधिच कळली नाही. त्याचमुळे असेल कदाचित मी कधीच तुझा विचार केला नाही. समजदार, शांत,सोज्वळ, प्रेमळ आहेस तू.तुझं महत्व आमच्या आयुष्यात खूप मोठं आहे. हे खुशमतीसाठी नाही तर माझ्या प्रत्येक शब्दात तुझीच माया आहे. या जन्मदिनी परमेश्वराजवळ एकच मागणं तू सदैव सुखी असावं.
💐💐Wish you a Very Happy Birthday Pranita Tai💐💐💐
🎂🎂🎂💐 🎂🎂🎂
✍🏻 - प्रविणा भोयर (मुकुटबन)
06/12/2020
No comments:
Post a Comment