#HappyBirthdayप्रणिताताई🎂💐💐
★★★जीवनाला कारण आलं★★★
स्वप्न बघणारी माझी ताई
आज सत्यात उतरली
रोवून जमिनीवर घट्ट पाय
आभाळ पेलण्या सज्ज झाली।।
आव्हानांना पेलत आहे
समतेची धरुनी कास
प्रगल्भ प्रज्ञा दुरदूरष्टीची
शोभे तिच्या हाती पताका खास।।
उत्कर्षासाठी ही कर्तृत्व कर तू
माझी ताई सांगते मला
तळमळ तुझ्या हृदयातील बघून नाभतून वीजही खुनवती तुला।।
कर्मवीर हो संघर्षातुन
भावनेहून कर्तव्य थोर जान
सोज्वळ सफल जीवनासाठी कर स्वयंम अस्तित्व तयार।। सांगत असते नेहमीच ती
घे निर्धाराची मशाल
भान ठेवून उन्नतीचे
घाट धैर्य तुझे विशाल।।
प्रेमाच्या जिव्हाळ्याने
वाट आमची पाहते
हुंकार भरल्या अंतकरणातून
माया ओथंबून वाहते।।
भावंडांच्या भल्यासाठीचा
अट्टहास नेहमीच मांडते
लहान बहीण भाऊ मात्र
तिच्याच खोड्या काढते ।।
धरते मायेची सावली
जशी दुसरी आमची माऊली
वात्सल्या पुढे तिच्या
आमचे आकाश ठेंगणे झाले।।
स्वर्गाचाही नाही वाटणार
तितका हेवा मनात दाटतो
सुखासाठी माझ्या ताईच्या चंद्र तोडून द्यावा वाटतो ।।
अश्रू दाटले डोळ्यामध्ये
कोपऱ्यात जाऊन रडते
एक पंख तुटलेला पाहता
तिचं व्याकुळ मन तुटते।।
आस लागली मनाला
भाऊ माझा दुरुन गाडीनं येईन मखमलीचा सुंदर झगा
मला घेऊन देईल।।
कळून चुकले मला
आमच्यासाठी ती मनोमन झुरते संस्कार देऊन आम्हाला
ती समृद्धी कडे नेते ।।
सरळ साधं जगन आपलं
त्यात वरदान मला मिळालं
भाऊ-बहिणीच्या सामर्थ्याने माझ्या जगण्याला कारण आलं. ✍🏻 प्रफुल भोयर
7057586468
06/12/2018
0 Comments