◆ रक्तदान करून देशाला वाचवा
देशाला देण्यासाठी आपल्याकडे 10 मिनिटे वेळ आहे का ? असेल तर ऐका! आपल्या देशाला व आपल्या लोकांना आपली गरज आहे. कोविडमुळे संपूर्ण जग संकटात आहे. कोविडच्या रुग्णाला बरे करण्यासाठी शासकीय स्तरावर कसोशीचे प्रयत्न चालू आहे. रक्तातून निघणार कन्व्हर्जन Plasma थेरपी चा प्रयोग कोविड रुग्णाला चालू आहे यासाठी रक्ताची गरज आहे.
दररोज अनेक प्रकारचे गरजू गरीब रुग्ण उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल होत असतात. त्यामध्ये गरोदर महिला, ऍनिमिया, सिकलसेल, अपघातग्रस्त तसेच रक्तसंबंधीत आजाराच्या रुग्णाचा समावेश आहे. या प्रत्येक गरजूंपर्यंत रक्ताची मदत पोहोचवायची म्हणजे रक्तदात्यांची मोठया प्रमाणात नितांत गरज आहे.
कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थिती ला हाताळणे प्रत्येकासाठी एक आव्हान आहे.
कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे स्वैछिक रक्तदानाकडे रक्तदात्यांनी जवळ जवळ पाठच फिरवली आहे. मी प्रफुल भोयर जिल्हा रक्तपेढी ग्रुप यवतमाळ च्या वतीने प्रत्येक तरुणास जे रक्तदान करू शकतात अश्यांना कडकडीने आवाहन करतो की ज्या कोणाला शक्य आहे त्यांनी शासकीय रक्तपेढीत जाऊन स्वैछिक रक्तदान करा.
आपलं अमूल्य योगदान देशाला वाचविण्यासाठी द्या.:-- प्रफुल्ल भोयर
रक्तविर बहुउद्देशीय संस्था,
मुकुटबन
7057586468
No comments:
Post a Comment