मनोगत - महामारी कोरोनातून बरा होणाऱ्या रुग्णाची
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
वाटले नव्हते कधीच
अशीही लाट येईल
एकेक करत प्रदेश
व्यापुन सर्व घेईल।।
रुग्ण वाढीची तीव्रता
पार शिगेला पोचली
हिमालयाने तर सॅनिटर
आपल्या माथ्यालाचं खोचली।।
कळले होते मला
मरणाच्या वाटेत पडलो
माणुसकीचा पहिला धडा
मी येथूनच शिकलो।।
डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी
यांच्या सेवेने वाचलो
विलगिकरण पूर्ण करुन
थेट घरी पोचलो।।
कोरोनाच्या भीतीनं
कावरा बावरा झालो
मी स्वतःच जवळून
मृत्यू पाहून आलो।।
मग कळले मला
रुग्ण बरा होते
प्रतिकारशक्ती सुदृढतेने
अंगातला विषाणू मरते।।
महत्त्व जाणुन श्वासाचे
मी नव्याने घडलो
ऋण फेडण्या म्हणून
समाजसेवेस वळलो।।
घडली नाही सेवा
माझ्या हातून काही
रक्तातल्या प्लाझ्मा ला
दुसरा उपाय नाही।।
आज जगातलं मौल्यवान
दान देऊन आलो
रक्तामधून मी रुग्णाला
प्राण देऊन आलो।।
✍प्रफुल भोयर (यवतमाळ )
7057586468
No comments:
Post a Comment