आली दिवाळी...💫✨
आज माझ्या दिवसाची
आनंदाने सुरुवात झाली
मंगलदायी दिवाळी ही
भाग्य घेऊन आली।।
रेखाटली स्वागतास अंगणी
रांगोळी ही वाटे मोती
लक्ष्य दिव्यांची आरास
लख्ख उजळल्या ज्योती।।
अखंड उधळण सुखाची
ही कंदिलाची रोषणाई
मांगल्याचे बांधून तोरण
प्रकाशमय चैतन्यदायी।।
आकांक्षाचे वाहे वारे
प्रसन्न करुनी सोनसकाळी
अंधाराचा विनाश करण्या
समृद्धीची आली दिवाळी।।
✍🏻- प्रफुल भोयर मुकूटबन
7057586468
खूप छान लेख आहे तुझ अति सुंदर
ReplyDeleteप्रफुल, खूप छान कविता केलीस..👌👌😘😘
ReplyDeleteHappy diwali
ReplyDelete