अंगणवाडी केंद्र येदलापूर येथे १ जुलै निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले आहेत....
🇮🇳🙏🏻🌱
प्रवेशोत्सव मेळाव्याने जिल्हा परिषद शाळेची सुरुवात
◆ स्वयंसेवक म्हणून प्रफुल भोयर यांचा सन्मान
"विश्वात्मक औदार्य - रक्तपेढी एक वरदान" हे पुस्तक रक्तदात्यांसाठी समर्पित
सामाजिक पुस्तक रक्तदात्यांना समर्पित करताना आमदार येरावार साहेब. |
जागितक रक्त दाता दिनविशेष.....🩸
मनःपुर्वक धन्यवाद दैनिक दिव्य मराठी परिवार यवतमाळ
कधीही आणि कुठेही करा रक्तदान ।
प्रत्येक दान आहे मानवतेसाठी वरदान ।।
Thank You.
World Blood Donor Day🩸
१४-०६-२०२२
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
"विश्वात्मक औदार्य - रक्तपेढी एक वरदान"
हे लेखक प्रफुल भोयर लिखित उत्तम दर्जाचे पुस्तक आहे. प्रत्येक तरुणांना कळेल अशी सुंदर प्रतिकृती आहे. जी रक्तदानासारखा महान संदेश सर्वदूर पोहोचवीत आहे. प्रफुल भोयर यांचे पुस्तक म्हणजे त्यांचे रक्तदान क्षेत्रातील कार्य जिल्ह्याचा लौकिक वाढविण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. मृत्यूच्या खोल गर्तेत असलेल्या रुग्णाचे प्राण वाचविण्याचे भाग्य लाभलेले जीवनदाते अशी लेखक प्रफुलची ओळख आहे. वयाने लहान पण सेवेच्या बाबतीत हिमालयाएवढे कार्य, उच्च विचार पातळी प्रफुल च्या लेखनातून दिसून येते. प्रफुल यांची कार्य करण्याची उमेद, ऊर्जा, उत्साह सर्व तरुणांना प्रेरणा देत आहे.
अशा लेखकाने प्रयत्नपूर्वक लिहिलेलं पुस्तक वाचनीय आहे. जगाला मानवतेचा आणि शांततेचा संदेश देणारे आहे. मानवता जपून केले गेलेले कार्य नक्कीच वरदान ठरेल. रक्तदान या मानवतेच्या सर्वोच्च सेवेविषयी रक्तपेढीची महती सांगणारे पुस्तक सर्वांनी एकदा अवश्य वाचा. विश्वात्मक औदार्य- रक्तपेढी एक वरदान" हे पुस्तक आजच्या जागतिक रक्तदान दिनानिमित्त देशातील सर्व मानवतेसाठी झटणाऱ्या रक्तदात्यास समर्पित.
-प्रफुल भोयर ( मुकुटबन )
"विश्वात्मक औदार्य - रक्तपेढी एक वरदान"
7057586468
जागतिक रक्तदान दिनानिमित्ताने.....
रक्तदान जनजागृती चळवळ
"प्राणदाता-रक्तदाता"
★◆◆ रक्तदान दिन ◆◆★
मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. एकट्याने राहण्यापेक्षा तो समाजात राहणे पसंद करतो. मदतगार, आपुलकी, मानवता, क्षमाशीलता आणि विवेकबुद्धी यासारख्या मानवी मूल्यांना जपत कुणाच्या ना कुणाच्या कामात मदत करीत असतो.
अनेक लोक सेवेची संधी शोधत असतात. आपला देह कुणाच्या कामी यावा म्हणणारे जरी कमी असले तरी आपण कुणाच्या कामी यावे म्हणणारे काही कमी नाही. अनेकांजवळ आज मदत करण्याची संधी चालून येते नात्याला, मित्राला, शेजाऱ्याला, अनोळखीला. पण संधी शोधणारा आणि संधीला ठोकर मारणारा असा दुहेरी गट तयार झालेला असतो.
जीवनात येणाऱ्या अडचणी, वादळांना घेऊन जगताना आपण आपल्यातून बाहेर येऊन इतरांच्या मदतीसाठी इतरांच्या जगण्याचा विचार करतो. याहून वेगळी मानवता काय असू शकते. कुणासाठी काही करूच म्हणणाऱ्या मनासाठी पण माझ्या मते रिकाम्या हातालाही त्यांच्या जवळ देण्यासारखे खूप काही आहे.
होय आपण बोलतोय ते रक्तदानाविषयी. अन्नदान वस्त्रदानाप्रमाणेच एक सोज्वळ आणि सात्विक दान म्हणून रक्तदानाकडे पाहिले जाते. समाजाप्रती कृतज्ञता म्हणून दरवर्षी जागतिक रक्तदान दिनाच्या दिवशी लाखोंनी रक्तदान करतात.
खरतर रक्तदान हे साधारण काम नाही. माझा एक मित्र त्याने खूप आधी रक्तदान केलं. जवळजवळ तीन वर्षे झालीच असावी, आणि नंतर मला नेहमीच बोलत असतो की रक्तदान करायचंय पण ऐन वेळेवर भाऊंना भीती वाटते.
रक्तपेढीत जाऊन वापस येणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. यातून सांगायचंय एवढच की शरीर सुदृढ आणि रक्तदानयोग्य असणं गरजेचं नाही तर रक्तदानासाठी मनाची तयारी असावी लागते.
तेव्हाच रक्तदानासारखे पुण्य आपल्या हातातून घडते.
संकल्पना / संयोजक
प्रफुल भोयर
मुकुटबन
7057586468
#Bravery_Raktveer
रक्तदान दिनाच्या निमित्ताने.....
रक्तदान जनजागृती चळवळ
"प्राणदाता - रक्तदाता"
आज रक्तदानाचा संदेश घराघरात पोहोचत आहे. यासाठी एक ना अनेक माध्यम उपयोगात येत आहे. असे म्हणतात की रक्तदान ही लोकचळवळ झाली पाहिजे. हे अगदी खरं आहे. गरजवंतव्यतिरिक्त इतरांना रक्तदान ही संकल्पना जाणूनच घ्यायची नाही आहे, असे ही अनेक नागरिक आजही आपल्यात आहे. पण त्यांच्यासाठी एकच सांगणं आहे, आज इतरांना आहे पण ती गरज उद्या तुम्हांलाही उद्भवू शकते. जीव कुणाचाही असो, प्राणाहुन अति महत्वाचे काहीही नाही. त्यामुळे इतरांनाही महत्व द्यायला आपण शिकले पाहिजे.
समाजात शांततेचा संदेश प्रस्थापित करायचा असेल तर स्वभावात नम्रता असायला हवी. इतरांना मदत करण्याची इच्छा असायला हवी, आपुलकीने वागता यायला हवे, मग बघाच दान करा हे कधीच कुणाला सांगावं लागणार नाही.
प्राणदाता-रक्तदाता ही अशीच एक चळवळ आहे, जी सामान्यातल्या सामान्य माणसाला जुळवू पाहते आहे, समाजात शांततेचा संदेश प्रस्थापित करू पाहते आहे, आपल्या सर्वांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून ही मोहीम राज्य तथा राष्ट्र स्तरावर एक यशस्वी विशाल रूप धारण करेल, यात समाविष्ट सर्वांचे सामाजिक नेटवर्क बळकट होऊन मानवतेचा, आपुलकीचा, समानतेचा तसेच शांततेचा संदेश आपोआपच सर्वदूर पसरेल. हेच कार्य करण्याचे सदर 15 दिवशीय मोहिमेने हाती घेतले आहे- तरुणांना जागृत करण्यासाठी, राष्ट्राच्या जडणघडणीचे.
जन मनाच्या जपणुकीसाठी आपण सदैव तत्पर आहो, हेही तेवढेच सत्य कथन.
संकल्पना/संयोजक
प्रफुल भोयर
मुकूटबन
7057586468
प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता ◆ कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...