"जागतिक रक्तदान दिनानिमित्त..."
रक्तदान जनजागृती चळवळ
"प्राणदाता-रक्तदाता"
रक्तदाते नसाल तरीही प्रेरणादाते नक्कीच व्हा!
रक्तदान चळवळ तंत्रज्ञानदृष्ट्या व सामाजिक स्तरावर अनेक प्रकारे विकसित होणे गरजेचे आहे. ते सातत्याने केल्या जाणाऱ्या अथक प्रयत्नांमधूनच शक्य होणार आहे. म्हणून रक्तदान चळवळीत समाजामधील प्रत्येक व्यक्ती अनिवार्य आहे व प्रत्येकात रक्तदानाची प्रेरणा चिरकाल टिकणे आवश्यक आहे.
काही लोक रक्तदानासाठी उत्सुक असतात; परंतु शारीरिक दौर्बल्यामुळे रक्तदान करू शकत नाहीत. त्यांनी निराश न होता अन्य नागरिकांमध्ये व तरुणांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य करावे, रक्तदानाइतकेच महत्त्व व आवश्यकता रक्तदान प्रबोधनाची आहे.
रक्तदान कोण करू शकतो, यासाठी अनेक निकष आहे. या निकषात न बसणाऱ्यांनाही रक्तदान चळवळीत काम करण्याची इच्छा असते. त्यांना रक्तदाते होता आले नाही, तरी इतरांना प्रोत्साहित करून प्रेरणादाते नक्की होता येते.
म्हणूनच रक्तदाते होता आलं नसेल तरीही प्रेरणादाते नक्कीच व्हा.
रक्तदान या मानवतेच्या सर्वोच्च क्षेत्रासाठी तरुणांनी घेतलेल्या मेहनतीला भरभरून यश आलं आणि चळवळ यशस्वी ठरत आहे.
हीच रक्तदान चळवळ कधीकाळी सुरू झाली होती तिला आज व्यापक बनवण्याची नितांत गरज आहे.
रक्ताची कमतरता पडून रक्ताअभावी कुणाचा जीव जाऊ नये आणि रक्तदानाची व्यापकता तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी मी राबवित असलेल्या 15 दिवशीय रक्तदान जनजागृती चळवळ "प्राणदाता-रक्तदाता" या मोहिमे अंतर्गत आज राकेश राजू भोंगळे आणि निखिल बंडूजी दहापुते या दोन युवकांनी माझ्याशी संपर्क साधून रक्तदानाची इच्छा केली आणि श्री. वसंतराव नाईक शासकीय रक्तपेढी यवतमाळ येथे रक्तदान केलं. दाते कॉलेज यवतमाळ चे विद्यार्थी असलेले तरुणांनी "प्राणदाता रक्तदाता" या मोहिमेसाठी केलेल्या सात्विक दानासाठी त्यांचे खूप खूप आभार.
14 जुन पर्यत चालू असलेल्या या मोहिमेतून मानवतेसाठी रक्तदान हा संदेश खेड्यापाड्यातील युवक-युवती पर्यत पोहोचवून ही चळवळ व्यापक करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि चळवळ यशस्वी करावी.
चला आपणही रक्तदान करुया !
रक्तदानाची चेतना ।। तरुणांसाठी ठरली प्रेरणा।।
संकल्पना / संयोजक
प्रफुल भोयर
मुकुटबन, यवतमाळ
7057586468
#Bravery_Raktveer 😊
No comments:
Post a Comment