जागतिक रक्तदान दिनानिमित्त........
रक्तदान जनजागृती चळवळ
"प्राणदाता-रक्तदाता"
यवतमाळ जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी श्री. येडगे साहेब यांच्या हस्ते समाजाला मानवतेचा संदेश देणाऱ्या या मोहिमेचा शुभारंभ पार पडला. त्याबद्दल माननीय जिल्हाधिकारी साहेबांचे मनःपूर्वक आभार....
साहेबांनी "प्राणदाता-रक्तदाता" या रक्तदान जनजागृती चळवळीचा परीघ विस्तारावा, यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील तरुणांना रक्तदानाचा संदेश दिला.
आज ऍनिमिया प्रकारच्या आजारामध्ये रुग्णाला रक्त देण्याची गरज पडते, त्याचप्रमाणे आकस्मित शस्त्रकियेसाठी तातडीने रक्ताची गरज लागते. रक्तामध्ये विविध घटक असतात जसे प्लाझ्मा, RBC, WBC. असे रक्त कृत्रिम रित्या तयार करता येत नाही आणि अधिक काळ साठवूनही ठेवता येत नाही.
रक्तपेढीने आजपर्यंत विविध माध्यमातून रक्तदान शिबीरे आयोजित करून आजवर हजारो बाटल्या रक्त संकलित केले आणि शेकडो लोकांचे प्राण वाचवले आहेत. पण दर वर्षी उन्हाळा जसा जसा वाढत जातो, तसतसे पाण्याप्रमाणे रक्ताचीही कमरतरता जाणवू लागते. रुग्णांना लागणाऱ्या रक्ताची गरज पुरवता येत नाही, कारण एप्रिल, मे आणि जून या महिन्यात देशभरात स्वैछेने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या संख्येतही मोठया प्रमाणात घट होते. यावर सर्व स्तरावरून प्रयत्न करत असूनही पुरेसे रक्त मिळू शकत नाही.
रक्तपेढीमध्ये सर्व गटाचे रक्त उपलब्ध असणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन गावागावात रक्तदानाची चळवळ उभी राहून घराघरात एक तरी रक्तदाता तयार होण्यासाठी सदर बाब निश्चितच प्रोत्साहनपर आहे. या मोहिमेमुळे रक्तदानाविषयी असलेल्या गैरसमजुती दूर होऊन रक्तदानाप्रती स्वयंस्फूर्तीने ऐच्छिक रक्तदान चळवळीच्या संकल्पनेस नक्कीच मदत होईल.
म्हणूनच म्हटले आहे, रक्तदान सर्वश्रेष्ठ दान.....
संकल्पना / संयोजक
प्रफुल भोयर
मुकुटबन, यवतमाळ
7057586468
#Bravery_Raktveer
No comments:
Post a Comment