01 June 2022

रक्तदान जनजागृती चळवळ "प्राणदाता-रक्तदाता" - 01-June

 रक्तदान जनजागृती चळवळ

"प्राणदाता-रक्तदाता"


जागतिक रक्तदान दिनानिमित्त....


          रक्तदान जनजागृती चळवळीला कालपासून सुरुवात झाली. पुढच्या 14 दिवस चालणाऱ्या या समाजोपयोगी मोहिमेला मानवतेचा जागर आपण नक्कीच म्हणू शकू.

मानवी मूल्य करू आत्मसात ।
सुरक्षित जगण्याच्या विश्वासात ।।

          "प्राणदाता-रक्तदाता" या मोहिमेचा शुभारंभ काल आपल्या नियमित रक्तदात्यांच्या हस्ते दिनांक 31 मे 2022 रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनाला करण्यात आला. या मोहिमेचे उद्दिष्ट म्हणजे कुणालाही  रक्ताअभावी आपल्या प्राणाला मुकावे लागू नये. यासाठीच मोहिमेचे नाव "प्राणदाता-रक्तदाता" देण्यात आले. दाता हा नेहमीच महान असतो. दानाचा निर्णय घेण्यासाठी दातृत्वशक्ती दांडगी असावी लागते. पण प्रत्येकवेळी माणसाला सामाजिक जबाबदारीची जाणीव होतेच असे नाही. यामुळेच कदाचित या सर्वांमध्ये स्वैच्छिक रक्तदाता मात्र आभाराच्याही कोसो दूर राहतो. पण तरीही समाजभान जपण्यासाठी केलेले सात्विक दान सत्कारणी लागते आणि अमूल्य असा मानवी जीव वाचतो. म्हणूनच जीवनात मानवी मूल्य आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे एकमेकांत आपुलकी टिकून राहते. पर्यायी आपण इतरांच्या मदतीसाठी धावून जातो. नियमित, दर 15 दिवसांनी ज्यांना रक्त पुरवठ्याची गरज असते, रक्तदानातून अशा रुग्णांना सुरक्षित जगण्याच्या विश्वासात जगता येते. म्हणून शक्य सर्वांनी रक्तदान करावे.

संकल्पना / संयोजक
प्रफुल भोयर 
मुकुटबन, यवतमाळ
7057586468
#Bravery_Raktveer

No comments:

Post a Comment

कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...