"विश्वात्मक औदार्य - रक्तपेढी एक वरदान"
हे लेखक प्रफुल भोयर लिखित उत्तम दर्जाचे पुस्तक आहे. प्रत्येक तरुणांना कळेल अशी सुंदर प्रतिकृती आहे. जी रक्तदानासारखा महान संदेश सर्वदूर पोहोचवीत आहे. प्रफुल भोयर यांचे पुस्तक म्हणजे त्यांचे रक्तदान क्षेत्रातील कार्य जिल्ह्याचा लौकिक वाढविण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. मृत्यूच्या खोल गर्तेत असलेल्या रुग्णाचे प्राण वाचविण्याचे भाग्य लाभलेले जीवनदाते अशी लेखक प्रफुलची ओळख आहे. वयाने लहान पण सेवेच्या बाबतीत हिमालयाएवढे कार्य, उच्च विचार पातळी प्रफुल च्या लेखनातून दिसून येते. प्रफुल यांची कार्य करण्याची उमेद, ऊर्जा, उत्साह सर्व तरुणांना प्रेरणा देत आहे.
अशा लेखकाने प्रयत्नपूर्वक लिहिलेलं पुस्तक वाचनीय आहे. जगाला मानवतेचा आणि शांततेचा संदेश देणारे आहे. मानवता जपून केले गेलेले कार्य नक्कीच वरदान ठरेल. रक्तदान या मानवतेच्या सर्वोच्च सेवेविषयी रक्तपेढीची महती सांगणारे पुस्तक सर्वांनी एकदा अवश्य वाचा. विश्वात्मक औदार्य- रक्तपेढी एक वरदान" हे पुस्तक आजच्या जागतिक रक्तदान दिनानिमित्त देशातील सर्व मानवतेसाठी झटणाऱ्या रक्तदात्यास समर्पित.
-प्रफुल भोयर ( मुकुटबन )
"विश्वात्मक औदार्य - रक्तपेढी एक वरदान"
7057586468
No comments:
Post a Comment