05 June 2022

रक्तदान जनजागृती चळवळ "प्राणदाता - रक्तदाता" 05-June

 रक्तदान दिनाच्या निमित्ताने.....



रक्तदान जनजागृती चळवळ

"प्राणदाता - रक्तदाता"

          आज रक्तदानाचा संदेश घराघरात  पोहोचत आहे. यासाठी एक ना अनेक माध्यम उपयोगात येत आहे. असे म्हणतात की रक्तदान ही लोकचळवळ झाली पाहिजे. हे अगदी खरं आहे. गरजवंतव्यतिरिक्त इतरांना रक्तदान ही संकल्पना जाणूनच घ्यायची नाही आहे, असे ही अनेक नागरिक आजही आपल्यात आहे. पण त्यांच्यासाठी एकच सांगणं आहे, आज इतरांना आहे पण ती गरज उद्या तुम्हांलाही उद्भवू शकते. जीव कुणाचाही असो, प्राणाहुन अति महत्वाचे काहीही नाही. त्यामुळे इतरांनाही महत्व द्यायला आपण शिकले पाहिजे.

          समाजात शांततेचा संदेश प्रस्थापित करायचा असेल तर स्वभावात नम्रता असायला हवी. इतरांना मदत करण्याची इच्छा असायला हवी, आपुलकीने वागता यायला हवे, मग बघाच दान करा हे कधीच कुणाला सांगावं लागणार नाही. 

           प्राणदाता-रक्तदाता ही अशीच एक चळवळ आहे, जी सामान्यातल्या सामान्य माणसाला जुळवू पाहते आहे, समाजात शांततेचा संदेश प्रस्थापित करू पाहते आहे, आपल्या सर्वांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून ही मोहीम राज्य तथा राष्ट्र स्तरावर एक यशस्वी विशाल रूप धारण करेल, यात समाविष्ट सर्वांचे सामाजिक नेटवर्क बळकट होऊन मानवतेचा, आपुलकीचा, समानतेचा तसेच शांततेचा संदेश आपोआपच सर्वदूर पसरेल. हेच कार्य करण्याचे सदर 15 दिवशीय मोहिमेने हाती घेतले आहे- तरुणांना जागृत करण्यासाठी, राष्ट्राच्या जडणघडणीचे. 

          जन मनाच्या जपणुकीसाठी आपण सदैव तत्पर आहो, हेही तेवढेच सत्य कथन.


                 संकल्पना/संयोजक

                     प्रफुल भोयर

                       मुकूटबन

                   7057586468

No comments:

Post a Comment

कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...