जागतिक रक्तदान दिनानिमित्ताने.....
रक्तदान जनजागृती चळवळ
"प्राणदाता-रक्तदाता"
★◆◆ रक्तदान दिन ◆◆★
मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. एकट्याने राहण्यापेक्षा तो समाजात राहणे पसंद करतो. मदतगार, आपुलकी, मानवता, क्षमाशीलता आणि विवेकबुद्धी यासारख्या मानवी मूल्यांना जपत कुणाच्या ना कुणाच्या कामात मदत करीत असतो.
अनेक लोक सेवेची संधी शोधत असतात. आपला देह कुणाच्या कामी यावा म्हणणारे जरी कमी असले तरी आपण कुणाच्या कामी यावे म्हणणारे काही कमी नाही. अनेकांजवळ आज मदत करण्याची संधी चालून येते नात्याला, मित्राला, शेजाऱ्याला, अनोळखीला. पण संधी शोधणारा आणि संधीला ठोकर मारणारा असा दुहेरी गट तयार झालेला असतो.
जीवनात येणाऱ्या अडचणी, वादळांना घेऊन जगताना आपण आपल्यातून बाहेर येऊन इतरांच्या मदतीसाठी इतरांच्या जगण्याचा विचार करतो. याहून वेगळी मानवता काय असू शकते. कुणासाठी काही करूच म्हणणाऱ्या मनासाठी पण माझ्या मते रिकाम्या हातालाही त्यांच्या जवळ देण्यासारखे खूप काही आहे.
होय आपण बोलतोय ते रक्तदानाविषयी. अन्नदान वस्त्रदानाप्रमाणेच एक सोज्वळ आणि सात्विक दान म्हणून रक्तदानाकडे पाहिले जाते. समाजाप्रती कृतज्ञता म्हणून दरवर्षी जागतिक रक्तदान दिनाच्या दिवशी लाखोंनी रक्तदान करतात.
खरतर रक्तदान हे साधारण काम नाही. माझा एक मित्र त्याने खूप आधी रक्तदान केलं. जवळजवळ तीन वर्षे झालीच असावी, आणि नंतर मला नेहमीच बोलत असतो की रक्तदान करायचंय पण ऐन वेळेवर भाऊंना भीती वाटते.
रक्तपेढीत जाऊन वापस येणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. यातून सांगायचंय एवढच की शरीर सुदृढ आणि रक्तदानयोग्य असणं गरजेचं नाही तर रक्तदानासाठी मनाची तयारी असावी लागते.
तेव्हाच रक्तदानासारखे पुण्य आपल्या हातातून घडते.
संकल्पना / संयोजक
प्रफुल भोयर
मुकुटबन
7057586468
#Bravery_Raktveer
No comments:
Post a Comment