प्रवेशोत्सव मेळाव्याने जिल्हा परिषद शाळेची सुरुवात
◆ स्वयंसेवक म्हणून प्रफुल भोयर यांचा सन्मान
२७ जून ला शाळेचा पहिला ठोका पडला. यंदा प्रत्येक जिल्हा परिषद च्या शाळांमध्ये पहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले होते. त्या अनुषंगाने सर्वत्र दोन मेळावे आयोजित करून त्यामधून मुलांचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी प्रयत्न केले गेले.
झरी तालुक्यातील येदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये 29 जून रोजी दुसऱ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सात प्रकारचे स्टॉल लावून प्रदर्शन भरवण्यात आले होते.
प्रफुल भोयर यांनी या काळात स्वयंसेवक म्हणून दिलेल्या योगदानासाठी शाळा व्यवस्थापन समिती येदलापूर यांचे कडून शाळापूर्व तयारी उपक्रमांतर्गत सक्रिय सहभागाबद्दल प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या मेळाव्यासाठी अंगणवाडी सेविका श्रीमती नंदा भोयर तसेच जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री. चाटे सर यांनी मेहनत घेतली. यासाठी अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत तसेच गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग लाभला.
No comments:
Post a Comment