27 June 2021

गैरसमज करा दूर।। रक्तदानाने जुडवू जगण्याचे सूर।।

 गैरसमज करा दूर।। रक्तदानाने जुडवू जगण्याचे सूर।।



          जगावर कोरोनाचे पडसाद उमटले. सर्वत्र भीतीचे वारे वाहू लागले. जीवाचं मोल प्रत्येकानं जाणलं. आपल्यांना जपावं, ही भावना निर्माण झाली. जीव वाचवण्याला प्राधान्य देणारा समाज रक्तदानाकडे भीतीने पहायला लागला. रक्तदात्यांच्या मनात रक्तदानाविषयी गैरसमज तयार झाला. एकंदरीत रक्तपेढीतला रक्त साठा संपला.यामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा आहे.

          राज्यात रक्ताचा तयार झालेला तुटवडा भरून काढण्यासाठी लोकमत तर्फे रक्ताचं नातं ही मोहीम राबवल्या जात आहे. स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात भव्य रक्तदान महायज्ञ आयोजित केला आहे.

         मी प्रफुल भोयर रक्तवीर बहुउद्देशीय संस्था यवतमाळ च्या वतीने सर्व तरुणांना आवाहन करतो की दिनांक 2 जुलै ला यवतमाळ स्थानिक येथे रक्तदानाचे आयोजन केले आहे, तरी शक्य असलेल्या सर्व रक्तदात्यांनी इथे रक्तदान करावे. आपला सहयोग मानवतेच्या हितासाठी द्यावा.


स्थळ:-दर्डा मातोश्री सभागृह, यवतमाळ

दिनांक:- 2जुलै,2021


कधीही आणि कुठेही करा रक्तदान।।

प्रत्येक दान आहे मावतेसाठी वरदान।।


रक्तदान करण्यासाठी इच्छुक असेल तर संपर्क करा...!

मो. नं :- 7057586468

21 June 2021

रक्तपेढी BTO यांच्या समावेत..

श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रक्तपेढी विभाग चे रक्तसंक्रमण अधिकारी मा. डॉ. दत्ता चौरे सर यांच्या सोबत.



 

14 June 2021

२० व्या वर्षी तरुणाची रक्तदान क्षेत्रात सर्वोच्च सेवा...

        #रक्तदान क्षेत्रात लाभत असलेल्या आपल्या अमूल्य योगदानातून युवकांकडून मानवता घडत आहे. आपल्याला #मदतीमुळेच हे शक्य होत आहे. मनःपूर्वक धन्यवाद सर्व #वृत्तपत्राचे..!!









🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳
आपलाच प्रफुल भोयर
#Bravery_Raktveer #विश्वात्मक_औदार्य
🙏🙏♥️♥️

मजसाठी एवढं करशील ना !

 जागतिक रक्तदान दिनानिमित्त लेख...


मजसाठी एवढं करशील ना !


           विश्वात्मक औदार्य हे नाव तस अतिसुंदर, अर्थही व्यापकच आहे. पण प्रत्येक मनामनात दातृत्वाची वृत्ती जागृत करणे, हे मात्र कठीण काम आहे. 

          भारतीय परंपरेत दानाला विशेष महत्व आहे. जेवणापूर्वी अन्न हे पूर्णब्रम्ह समजून एक घास भुकेलेल्याला देतात. कुणी तहानेने व्याकुळ वाटसरूला थंड पाण्याने तृप्त करतात. गायीच्या पोटात देवाचं वास्तव्य आहे म्हणून तिला नैवद्य दाखवितात. रोग्याला औषध दिल जाते, मुलांना शाळेत टाकलं जाते, त्यांचा खर्च उचलला जातो, विनामोबदला कसलीही अपेक्षा न करता हे सर्व करणारा कनवाळू आजही आपल्यात आहे. हे दान धर्माचे कार्य पुण्य घडावे म्हणून पूर्वीपासून चालत आलेले आहे. मानवजीवनात मनुष्यजन्म सार्थक ठरावा, यासाठी माणूस जन्मभर अविरतपणे धडपडत असतो. समाधानाच्या शोधात जणू तो प्रेमाने स्नेहबंधाची पेरणीच करीत असतो. प्रेमाने जग जिकता येते, असे म्हणतात ते उगाचच नाही.

          दान कुठलंही असो ते सात्विक, सोज्वळ आणि अंतःकरणापासून असावं. आज ज्यांच्या जवळ अन्न, वस्त्र आणि निवारा नसणारेही अनेक कुटुंब आहे. अशांना सेवाभावी लोकांकडून नेहमीच मदत केली जाते. अन्नदान, वस्त्रदान, नेत्रदान अवयवदान याप्रमाणेच एक पवित्र दान म्हणजे रक्तदान.

आपण आपल्यातल्या मानवी मूल्यांना जागृत करून सामाजिक बांधिलकी म्हणून स्वैच्छिक रक्तदान करीत असतो. आजही माणसाचा परमेश्वरावर प्रचंड विश्वास आहे. आपल्या धार्मिक संस्कृतीने म्हणा की आईने आपल्यावर केलेल्या संस्काराने म्हणा, पण आपण सामाजिक नितीमूल्याची जाणीव ठेऊनच वागतो. सर्वांच्या वर्तनात साम्य जरी नसेल तरी साधेपणा आणि विवेकबुद्धी नक्कीच आहे. एकमेकांचा आपण किती आदर करतो. इतरांशी कसे वागतो, यावरच मानवी मूल्याचे मापन होत असते. मानवी मूल्याची जपणूक होण्यासाठी रक्तदान दिनासारखे दिवस साजरे करणे गरजेचे आहे.

          १४ जून हा जागतिक रक्तदान दिवस म्हणून संपूर्ण जगात साजरा होत असतो. यादिवशी रक्तदाते स्वैच्छिक रक्तदान करून मानवता जपत असतात. मदत करणे हा प्रत्येक मानवाचा गुणधर्म आहे. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या वेळी कुणाला तरी मदत करीत असतात. रक्तदान हेच श्रेष्ठदान........या वृत्तीने अनेक जण रक्तदान करीत असतात. काहीजण रक्तापलीकडे जाऊन रक्ताची नाती जपतात आणि मानवतेच मोठं वलय निर्माण होते. याच वलयातून माणूस एकमेकांना जोडला जातो, आणि सामूहिक प्रगती सुरू होते. जीवनाच्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजूने विचार करण्याची क्षमता येते. एकंदरीत जगणे सुंदर होते. मानवता जीवन जगण्याचा मार्ग दाखवते. मानवता जोपासण्याचा आणि आचरणात आणण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे रक्तदान आहे.

          दैनंदिन जीवनात लोक अनेक प्रश्नाने चिंतित असतात.  मनाला स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. आनंदी राहण्यासाठी अनेक जण स्वतःला कामात व्यस्त ठेवतात. छंद जोपासतात, कुणी मनाच्या समाधानासाठी गरजवंताची सेवा करतात, कुणी दान देतात, या ना त्या कारणावरून सामाजिक बांधिलकी जोपासत असतात. 

         जे निरोगी, तंदुरुस्त आहे, कुणासाठी काहीतरी करूच अशी भावना मनात आहे त्यांनी जरूर रक्तदानाचा निर्णय घ्या. आवड म्हणून व छंद म्हणून नाही तर गरजवंतांना मदतीचा एक हात म्हणून शक्य असलेल्यांनी रक्तदान करा.

               थँलिसीमिया, सिकलसेल ग्रस्त मुलांना नेहमीच रक्ताची गरज असते. रक्त या विषयाला घेऊन अश्या मुलांच्या घरचे घाबरलेले असतात. दुःखामुळे त्या पालकांच्या जीवनातलं समाधान लोप पावलेल असत. आपण आपलं रक्तदान करून त्यांच्या प्रश्नावरचा उपाय होऊ शकतो. त्या मुळे उदासीनतेच्या गर्तेत जगणाऱ्या तरुणांच्या चेहऱ्यावर आपण कुणाच्या कामी आलो या जाणिवेने नक्कीच समाधान येईल.

            रक्ताची गरज सर्वालाच असते. कुणाला रक्त पाहीजे असते. तर कुणाला दान द्यायचे असते. प्रत्येकांच्या शरीरात असलेल्या या रक्तामुळे आज कित्येकांना जिवनदान मिळाले आहे. रक्तदानातून नवजीवन मिळणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. पण जेव्हा कुण्या जवळील जिवाभावाच्या  व्यक्तीला रक्ताची गरज भासते तेव्हाच त्यांना रक्ताची खरी किंमत कळते. मिञा तुमच्यासाठी काहीपण म्हणनारे देखील अशा वेळी कामी पडत नाही. त्या वेळी दाखवलेली हिम्मत म्हणजे रक्तदान होय. ज्याला सर्वश्रेष्ठ दान असेही म्हणतात. 

            आपलं दुःख बाजूला ठेऊन दुसऱ्यासाठी केलेल्या कृतीतून मिळणार समाधान खूप महान असते, याला आपण समृद्ध जगणं म्हणू शकतो.


          दान करू रक्ताचे

     बीज रुजवू समाधानाचे।।


          रक्तदान असो, नेत्रदान किंवा अवयवदान या मुळे रुग्णाची रोगावर यशस्वी मात होते आणि रुग्णाला आपल्या आयुष्यात चैतन्य भरण्यासाठी उभारी मिळते. त्यामुळे जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेचा अखंड प्रवाह वाहतो. 


 "दानाचा संकल्प करूया.....

           जीव वाचवूया"......


            दानामधून दान देणारा आणि घेणार दोघेही संतुष्ट होते. ज्या देवांवर ते विश्वासा ठेवतात, त्यांचे स्मरण करून नवीन आयुष्याला सुरुवात करतात. दातृत्वामुळे जन्मांतरीच्या लाभणाऱ्या समाधानाने माणसातच देव असल्याची साक्ष मिळते. म्हणून आपल्याजवळ असलेल्यातल थोडस दान करायलाच पाहिजे.  

         मजसाठी एवढं करशील ना! असे म्हणणारे थँलेसमिया, सिकलसेल रुग्ण सुखाने जगताना दिसेल.


             शब्दांकन:प्रफुल भोयर

                   (यवतमाळ)

             मो.न. 7057586468


दैनिक विदर्भ मतदार 


दैनिक सिहझेप


दैनिक लोकशाही वार्ता

दैनिक जनसंग्राम 


#दैनिक सुपर भारत
#दैनिक तरुण भारत

https://epaper.tarunbharat.net/article.php?mid=Mpage_2021-06-14_8483ee16b7af947da37422b16709c02460c69589796fb

सदर लेख जागतिक रक्तदान दिनानिमित्त १४ जून २०२१ ला दैनिक विदर्भ मतदार, सिहझेप, लोकशाही वार्ता, जनसंग्राम यवतमाळ  मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

मजसाठी एवढं करशील ना !.... हा लेख प्रकाशित करुन तुम्ही जी मानवतेला वंदना केली आहे, ती अनमोल आहे. आज ना उद्या लोकांना रक्तदानच महत्व कळेलच. पण या मुळे रक्तदान करणार्यांना रक्तदान केल्याचा आनंद आणि आणि उगवत्या युवा पिढीला प्रेरणा मिळेल, हे नक्कीच.




13 June 2021

#विश्वात्मक_औदार्य ◆ मानवतेसाठी दातृत्वाची दिव्य चळवळ ✨

 #विश्वात्मक_औदार्य

◆ मानवतेसाठी दातृत्वाची दिव्य चळवळ ✨

Date- 13-June-2021❣️



◆◆ माणुसकी जप💫💯


मानवासाठी एकाने

जरी तारे आणले तोडून

ताऱ्यांचीही गरज नाही

मानवी मूल्य सोडून


माणसाला जपण्यास जो

मानवता घेतो जोडून

असे केल्याने होईल 

तारे आणल्यासारखे तोडून


आभासात फिरती 

सारे ताऱ्यांचे वारे

कामी पड कुणाच्या

होईल आणल्यागत तारे


दातृत्व मनातील बनेल

मग मानव पुजारी

ताऱ्यापरी राहील बघ

हीच दुनिया न्यारी


ताऱ्यापेक्षा जड होईल

मानवतेचं माप

सुंदर होईल जीवन

फक्त माणुसकी जप

     ✍🏻- प्रफुल्ल भोयर

#Bravery_Raktveer😊

11 June 2021

#विश्वात्मक_औदार्य ◆ मानवतेसाठी दातृत्वाची दिव्य चळवळ ✨

 जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्ताने.......

          " विश्वात्मक औदार्य "

मानवतेसाठी दातृत्वाची दिव्य चळवळ

     


     या मोहिमेतून तरुणांना रक्ताच्या प्रत्येक थेंबाचं महत्व सांगणारी माझी कविता-'मी थेंब रक्ताचा'


मी थेंब रक्ताचा 🩸


      मी

     थेंब

    रक्ताचा

   धडा देतो

  माणुसकीचा

 उत्साही किरण

जगण्याच्या आशेचा।।


        हा

        देह

     मासाचा

    टाकलास

   द्रव रक्ताचा

  दानाने वाचतो

प्राण रुग्ण जीवाचा।।


        तू

       उठ

     त्यागाने

    निर्धारुनी

   ऐच्छिकतेने

  करा रक्तदान

आत्मपरिक्षणाने।।


       हो

      आहे 

      तयार

    दानासाठी

   केला विचार

 माझ्या महतीचा

करू जगी प्रचार।।


      जा 

    नक्की

     घडेल

    देशसेवा

   तृप्त होईल

  गरजू जनता

हास्य मुखी दिसेल।।

             -प्रफुल भोयर 

               (यवतमाळ)

08 June 2021

विश्वात्मक_औदार्य ◆ मानवतेसाठी दातृत्वाची दिव्य चळवळ ✨

 

Date- 08-June-2021❣️

रक्ताची नाती:-
           
          रक्त हा मानवी शरीरातील महत्वाचा घटक आहे. दैनंदिन जीवनात रक्ताची गरज मोठ्या प्रमाणात आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी रक्तदाते जोडणे फार गरजेचे आहे. दिवस बदलले,     तसे विभक्त कुटुंब पद्धतही तयार झाली. काही अपवाद वगळता सारेच आपल्या मर्जीचे राजे झाले आहेत. 

कशी जपावी कुणाकडे 
नाही रक्ताची नाती
माणुसकी अन परंपरा
ही सारे विसरुनी जाती

        भारताला समृद्ध अशी संस्कृती लाभली आहे. इतिहासही अतिशय प्रगल्भ आहे. दान धर्माची परंपराही फार जुनी आहे. पण आज माणुसकी आणि परंपरा लोक विसरत चालले आहे. रक्ताची नातीही संपुष्टात येत आहे. आपल्यांसाठीही धावून येणारे आता खुप कमी झाले आहेत. तशी कारणंही वेगवेगळी आहे.
            अनेक जण आपलं रक्त दान करून नवी नाती जोडत आहे. भेदभावना दूर सारून अशीही नाती कामी येतात. आणि एक बंध तयार होतो, आपुलकीचा  त्यांच्यातील ठासून भरलेल्या मानवतेचा. रक्ताची, मानलेली, जोडलेली, जपलेली, सांभाळलेली, नाते कसेही असो, ते कसे टिकवावे याचे सामर्थ्य फक्त नि फक्त संस्कारातच आहे. तेच संस्कार आपल्याला सांगत असते, अडलेल्यांना हात द्या. खचलेल्यांना धीर द्या, गरजवंतांना   मदत करा. 
         रक्तदानातून तीच मानवी मूल्य मानवात रुजली जाईल  आणि जीवन आणखीनच सुंदर होईल.
        
         संस्काराचे चीज करा।।
         गरजूंना मदत करा.....।।

         #विश्वात्मक_औदार्य
◆ मानवतेसाठी दातृत्वाची दिव्य चळवळ ✨
#Bravery_Raktveer😊
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://braveryraktveer.blogspot.com/2021/06/braveryraktveer.com.html

07 June 2021

#विश्वात्मक_औदार्य ◆ मानवतेसाठी दातृत्वाची दिव्य चळवळ ✨

 Date- 07-June-2021💫

#विश्वात्मक_औदार्य

◆ मानवतेसाठी दातृत्वाची दिव्य चळवळ ✨




रक्तदान करा, विश्वात्मक औदार्य दाखवा


           संपुर्ण जगात १४ जून ला "जागतिक रक्तदान दिन" साजरा केला जातो. यामुळे रक्ताच्या नात्याची एक अतूट साखळी निर्माण होऊन गरजूंचे प्राण वाचवण्याचे मोलाचे कार्य घडून येते. रक्त हा असा घटक आहे जो मानवी शरीराला जिवंत ठेवते. रक्ताच्या पातळीत कमतरता आल्यास मानवी देह कुठल्यातरी आजाराने ग्रस्त होऊ शकतो. निरोगी व सुदृढ राहण्यासाठी शरीरात रक्ताच्या पातळीचे प्रमाण योग्य राहणे, फार गरजेचे आहे. या संबंधी लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी व समाजाच्या तळागाळात पोहचून रक्तदाते वाढावे यासाठी 'रक्तविर बहुउद्देशीय संस्था' नेहमीच प्रयत्नरत असते.

       १४ जून ला साजऱ्या होणाऱ्या जागतिक रक्तदान दिनाच्या औचित्यावर  15 दिवशीय "विश्वात्मक औदार्य-मानवतेसाठी दातृत्वाची दिव्य चळवळ" या नावाने रक्तदान जनजागृती मोहीम संपूर्ण विदर्भात सुरू आहे. यामध्ये कविता, लेख, स्लोगन्स द्वारे सदर उपक्रमातुन रक्तदात्यांना रक्तदानाविषयी जागृत करण्यात येत आहे. सोशल मीडिया माध्यमातून राबविलेला "विश्वात्मक औदार्य" नावाचा उपक्रम समाजातल्या रक्तदात्यांना उपयोगी ठरत आहे. 

       ३१ मे रोजी साजरा झालेल्या जागतिक तंबाखू दिनापासून ते १४ जून रोजी होणाऱ्या जागतिक रक्तदान दिनापर्यत ही मानवतेसाठी चाललेली धडपड पुढेही चालू राहील.



*#Bravery_Raktveer😊*


*https://braveryraktveer.blogspot.com*

06 June 2021

#विश्वात्मक_औदार्य ◆ मानवतेसाठी दातृत्वाची दिव्य चळवळ ✨

Date- 06-June-2021 ❣️ 
#विश्वात्मक_औदार्य
◆ मानवतेसाठी दातृत्वाची दिव्य चळवळ ✨
समृद्ध जगणं :-
       जन्मभर माणूस समाधानाच्या शोधात असतो. सतत चालू असलेल्या धावपळीतुन आराम शोधताना दिसतो. मग जीवनातलं शाश्वत नसलेलं समाधान म्हणजे समृद्ध जगणं आहे का? समाधान कुठे मिळतं? ते कुठं शोधावे लागते ?
      दैनंदिन जीवनात लोक अनेक प्रश्नाने चिंतित असतात. मनाला स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. आनंदी राहण्यासाठी अनेक जण स्वतःला कामात व्यस्त ठेवतात. छंद जोपासतात, कुणी मनाच्या समाधानासाठी गरजवंताची सेवा करतात, कुणी दान देतात, या ना त्या कारणावरून सामाजिक बांधिलकी जोपासत असतात.
         जे निरोगी, तंदुरुस्त आहे, कुणासाठी काहीतरी करूच अशी भावना मनात आहे त्यांनी जरूर रक्तदानाचा निर्णय घ्या. आवड म्हणून व छंद म्हणून नाही तर गरजवंतांना मदतीचा एक हात म्हणून शक्य असलेल्यांनी रक्तदान करा. थँलिसीमिया, सिकलसेल ग्रस्त मुलांना नेहमीच रक्ताची गरज असते. रक्त या विषयाला घेऊन अश्या मुलांच्या घरचे घाबरलेले असतात. दुःखामुळे त्या पालकांच्या जीवनातलं समाधान लोप पावलेल असत. आपण आपलं रक्तदान करून त्यांच्या प्रश्नावरचा उपाय होऊ शकतो. त्या मुळे उदासीनतेच्या गर्तेत जगणाऱ्या तरुणांच्या चेहऱ्यावर आपण कुणाच्या कामी आलो या जाणिवेने नक्कीच समाधान येईल.
       रक्ताची गरज सर्वालाच असते. कुणाला रक्त पाहीजे असते. तर कुणाला दान द्यायचे असते. प्रत्येकांच्या शरीरात असलेल्या या रक्तामुळे आज कित्येकांना जिवनदान मिळाले आहे. रक्तदानातून नवजीवन मिळणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. पण जेव्हा कुण्या जवळील जिवाभावाच्या व्यक्तीला रक्ताची गरज भासते तेव्हाच त्यांना रक्ताची खरी किंमत कळते. मिञा तुमच्यासाठी काहीपण म्हणनारे देखील अशा वेळी कामी पडत नाही. त्या वेळी दाखवलेली हिम्मत म्हणजे रक्तदान होय. ज्याला सर्वश्रेष्ठ दान असेही म्हणतात. आपलं दुःख बाजूला ठेऊन दुसऱ्यासाठी केलेल्या कृतीतून मिळणार समाधान खूप महान असते, याला आपण समृद्ध जगणं म्हणू शकतो.

 दान करू रक्ताचे
बीज रुजवू समाधानाचे।।

 शब्दांकन:- प्रफुल भोयर (मुकुटबन)
7057586468
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 
#Bravery_Raktveer 😊https://www.facebook.com/108169334811370

05 June 2021

#विश्वात्मक_औदार्य◆ मानवतेसाठी दातृत्वाची दिव्य चळवळ

Date- 05-June-2021❣️
#विश्वात्मक_औदार्य
◆ मानवतेसाठी दातृत्वाची दिव्य चळवळ


एक निश्चय :- रक्तदानाचा🩸

            निमित्त कोणतही असो मात्र दान करणारा भेटणं हे तस आजही दुर्मिळच काम. याला अनेक अपवादही आहेत ह! पावलागणिक बरेचजण भेटतात आणि आपल्या प्राणाची बाजी लावतात, जीव वाचवतात आणि पुण्याईचा हिस्सेदार बनतात. दातृत्वासाठी काही जण स्वैच्छिक तयार होतात तर काहींना सांगण्याची गरज पडते. रक्तदानाविषयीची जनजागृती खूपच मर्यादित आहे. जनजागृती अभावी अनेक तरुण मनात रक्तदानाची इच्छा करतात मात्र भीतीपोटी किंवा अंधश्रद्धेतून माघार घेतात. त्यामुळे रक्तदानाच नुसतं महत्त्व माहित असून चालत नाही तर रक्तदात्यांच्या मनातील समज- गैरसमज दूर सारून त्यांना प्रत्यक्ष रक्तदानासाठी प्रोत्साहित करणे फार गरजेचे आहे.
         अनेकांची इच्छा असते की आपण कुणाच्या तरी कामी आलो पाहिजे, आपल्यातल्या ज्ञानाचा कुणाच्या भल्यासाठी वापर झाला पाहिजे. आपल्याजवळ काहीही नसताना दुसऱ्याच्या उपयोगात येण्यासारखं म्हणजे आपलं रक्तदान. म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून करा किंवा एक चांगला नागरिक म्हणून करा पण एक संकल्प रक्तदानासाठी जरूर करा.
         आजही तंत्रज्ञान खूप विकसित होऊनही रुग्ण नातेवाईक अक्षरशः रडतात. हात पाय ठणठणीत असूनही अपंग झालोय अस समजतात कारण रक्त रडत बसल्याने नाही ना मिळत. ज्यांना रक्ताची गरज आहे ते आपलेच कुणाचे तरी कुणी आहे, ही जाणीव सदैव असू द्या आणि मनात कराच एक निश्चय:-रक्तदानाचा........🩸
           शब्दांकन:-प्रफुल्ल भोयर
                              यवतमाळ

#Bravery_Raktveer 😊
https://www.facebook.com/108169334811370

04 June 2021

#विश्वात्मक_औदार्य- मानवतेसाठी दातृत्वाची दिव्य चळवळ✨

 

04-June-2021 ❣️
#विश्वात्मक_औदार्य- मानवतेसाठी दातृत्वाची दिव्य चळवळ✨
           जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्ताने.....🩸



🩸🩸 रक्तदान कर 🩸🩸

  आयुष्यात स्वतःच्या आनंद भर
  चल तू रक्तदान कर ।।

  माणूस हा समाजशील प्राणी आहे. रोजच्या कोणत्या ना कोणत्या कारणासाठी एकमेकांवर अवलंबून असतो. भावनाप्रधान अशा माणसाला इतरांच्या मदतीची गरज आहे. मग ती कुठल्याही स्वरूपात असू शकते. काही गरजा जगण्यासाठी आवश्यक तर काही वेळा अनावश्यकते साठीही कुणाची गरज पडू शकते.
अशीच एक गरज अति महत्वाची ठरली आहे. जी मानव जिवंत राहण्यासाठी पूर्ण होने खूप गरजेची आहे. रक्त ही गरजवंताची मोठी गरज आहे. ती पूर्ण केल्याने कुणाचा तरी जीव वाचेल आणि आपल्याला आत्मिक समाधान मिळेल.

प्रफुल्ल भोयर (यवतमाळ)
रक्तविर बहुउद्देशीय संस्था
#Bravery_Raktveer
7057586468

01 June 2021

#विश्वात्मक_औदार्य- मानवतेसाठी दातृत्वाची दिव्य चळवळ

 

दि.2 June, 2021
     #विश्वात्मक_औदार्य- मानवतेसाठी दातृत्वाची दिव्य चळवळ
जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्ताने.....🩸


रक्तदान - एक चळवळ

गरज आहे - काळाची
आयुष्यात करणे बचत
भविष्याची ती असते
आपली अनामत ।।

गरजू गरीब रुग्णांना
देता येईल धिर
घराघरात तयार होईल
एकेक रक्तविर ।।

गावागावात रक्तदानाची
सुरु होईल चळवळ
रक्त शोधण्यासाठी नाही
करावी लागणार धावपळ ।।

रक्तदानाच्या कार्याचा
तरुण धडा घेईल
वैश्विक समाजाची संकल्पना
तेव्हा दृढ होईल ।।

जीव वाचल्याने रुग्णास
खूप आनंद भेटेल
तुम्हा जन्मदिल्याचा
देवालाही अभिमान वाटेल ।।
      ✍🏻 -प्रफुल्ल भोयर (मुकुटबन)
           7057586468

#Bravery_Raktveer 😊
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://www.facebook.com/108169334811370


कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...