Date- 07-June-2021💫
#विश्वात्मक_औदार्य
◆ मानवतेसाठी दातृत्वाची दिव्य चळवळ ✨
रक्तदान करा, विश्वात्मक औदार्य दाखवा
संपुर्ण जगात १४ जून ला "जागतिक रक्तदान दिन" साजरा केला जातो. यामुळे रक्ताच्या नात्याची एक अतूट साखळी निर्माण होऊन गरजूंचे प्राण वाचवण्याचे मोलाचे कार्य घडून येते. रक्त हा असा घटक आहे जो मानवी शरीराला जिवंत ठेवते. रक्ताच्या पातळीत कमतरता आल्यास मानवी देह कुठल्यातरी आजाराने ग्रस्त होऊ शकतो. निरोगी व सुदृढ राहण्यासाठी शरीरात रक्ताच्या पातळीचे प्रमाण योग्य राहणे, फार गरजेचे आहे. या संबंधी लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी व समाजाच्या तळागाळात पोहचून रक्तदाते वाढावे यासाठी 'रक्तविर बहुउद्देशीय संस्था' नेहमीच प्रयत्नरत असते.
१४ जून ला साजऱ्या होणाऱ्या जागतिक रक्तदान दिनाच्या औचित्यावर 15 दिवशीय "विश्वात्मक औदार्य-मानवतेसाठी दातृत्वाची दिव्य चळवळ" या नावाने रक्तदान जनजागृती मोहीम संपूर्ण विदर्भात सुरू आहे. यामध्ये कविता, लेख, स्लोगन्स द्वारे सदर उपक्रमातुन रक्तदात्यांना रक्तदानाविषयी जागृत करण्यात येत आहे. सोशल मीडिया माध्यमातून राबविलेला "विश्वात्मक औदार्य" नावाचा उपक्रम समाजातल्या रक्तदात्यांना उपयोगी ठरत आहे.
३१ मे रोजी साजरा झालेल्या जागतिक तंबाखू दिनापासून ते १४ जून रोजी होणाऱ्या जागतिक रक्तदान दिनापर्यत ही मानवतेसाठी चाललेली धडपड पुढेही चालू राहील.
*#Bravery_Raktveer😊*
*https://braveryraktveer.blogspot.com*
No comments:
Post a Comment