Date- 06-June-2021 ❣️
#विश्वात्मक_औदार्य
◆ मानवतेसाठी दातृत्वाची दिव्य चळवळ ✨
समृद्ध जगणं :-
जन्मभर माणूस समाधानाच्या शोधात असतो. सतत चालू असलेल्या धावपळीतुन आराम शोधताना दिसतो. मग जीवनातलं शाश्वत नसलेलं समाधान म्हणजे समृद्ध जगणं आहे का? समाधान कुठे मिळतं? ते कुठं शोधावे लागते ?
दैनंदिन जीवनात लोक अनेक प्रश्नाने चिंतित असतात. मनाला स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. आनंदी राहण्यासाठी अनेक जण स्वतःला कामात व्यस्त ठेवतात. छंद जोपासतात, कुणी मनाच्या समाधानासाठी गरजवंताची सेवा करतात, कुणी दान देतात, या ना त्या कारणावरून सामाजिक बांधिलकी जोपासत असतात.
जे निरोगी, तंदुरुस्त आहे, कुणासाठी काहीतरी करूच अशी भावना मनात आहे त्यांनी जरूर रक्तदानाचा निर्णय घ्या. आवड म्हणून व छंद म्हणून नाही तर गरजवंतांना मदतीचा एक हात म्हणून शक्य असलेल्यांनी रक्तदान करा. थँलिसीमिया, सिकलसेल ग्रस्त मुलांना नेहमीच रक्ताची गरज असते. रक्त या विषयाला घेऊन अश्या मुलांच्या घरचे घाबरलेले असतात. दुःखामुळे त्या पालकांच्या जीवनातलं समाधान लोप पावलेल असत. आपण आपलं रक्तदान करून त्यांच्या प्रश्नावरचा उपाय होऊ शकतो. त्या मुळे उदासीनतेच्या गर्तेत जगणाऱ्या तरुणांच्या चेहऱ्यावर आपण कुणाच्या कामी आलो या जाणिवेने नक्कीच समाधान येईल.
रक्ताची गरज सर्वालाच असते. कुणाला रक्त पाहीजे असते. तर कुणाला दान द्यायचे असते. प्रत्येकांच्या शरीरात असलेल्या या रक्तामुळे आज कित्येकांना जिवनदान मिळाले आहे. रक्तदानातून नवजीवन मिळणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. पण जेव्हा कुण्या जवळील जिवाभावाच्या व्यक्तीला रक्ताची गरज भासते तेव्हाच त्यांना रक्ताची खरी किंमत कळते. मिञा तुमच्यासाठी काहीपण म्हणनारे देखील अशा वेळी कामी पडत नाही. त्या वेळी दाखवलेली हिम्मत म्हणजे रक्तदान होय. ज्याला सर्वश्रेष्ठ दान असेही म्हणतात. आपलं दुःख बाजूला ठेऊन दुसऱ्यासाठी केलेल्या कृतीतून मिळणार समाधान खूप महान असते, याला आपण समृद्ध जगणं म्हणू शकतो.
दान करू रक्ताचे
बीज रुजवू समाधानाचे।।
शब्दांकन:- प्रफुल भोयर (मुकुटबन)
7057586468
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
#Bravery_Raktveer 😊https://www.facebook.com/108169334811370
No comments:
Post a Comment