Date- 05-June-2021❣️
#विश्वात्मक_औदार्य
◆ मानवतेसाठी दातृत्वाची दिव्य चळवळ ✨
एक निश्चय :- रक्तदानाचा🩸
निमित्त कोणतही असो मात्र दान करणारा भेटणं हे तस आजही दुर्मिळच काम. याला अनेक अपवादही आहेत ह! पावलागणिक बरेचजण भेटतात आणि आपल्या प्राणाची बाजी लावतात, जीव वाचवतात आणि पुण्याईचा हिस्सेदार बनतात. दातृत्वासाठी काही जण स्वैच्छिक तयार होतात तर काहींना सांगण्याची गरज पडते. रक्तदानाविषयीची जनजागृती खूपच मर्यादित आहे. जनजागृती अभावी अनेक तरुण मनात रक्तदानाची इच्छा करतात मात्र भीतीपोटी किंवा अंधश्रद्धेतून माघार घेतात. त्यामुळे रक्तदानाच नुसतं महत्त्व माहित असून चालत नाही तर रक्तदात्यांच्या मनातील समज- गैरसमज दूर सारून त्यांना प्रत्यक्ष रक्तदानासाठी प्रोत्साहित करणे फार गरजेचे आहे.
अनेकांची इच्छा असते की आपण कुणाच्या तरी कामी आलो पाहिजे, आपल्यातल्या ज्ञानाचा कुणाच्या भल्यासाठी वापर झाला पाहिजे. आपल्याजवळ काहीही नसताना दुसऱ्याच्या उपयोगात येण्यासारखं म्हणजे आपलं रक्तदान. म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून करा किंवा एक चांगला नागरिक म्हणून करा पण एक संकल्प रक्तदानासाठी जरूर करा.
आजही तंत्रज्ञान खूप विकसित होऊनही रुग्ण नातेवाईक अक्षरशः रडतात. हात पाय ठणठणीत असूनही अपंग झालोय अस समजतात कारण रक्त रडत बसल्याने नाही ना मिळत. ज्यांना रक्ताची गरज आहे ते आपलेच कुणाचे तरी कुणी आहे, ही जाणीव सदैव असू द्या आणि मनात कराच एक निश्चय:-रक्तदानाचा........🩸
शब्दांकन:-प्रफुल्ल भोयर
यवतमाळ
#Bravery_Raktveer 😊
https://www.facebook.com/108169334811370
No comments:
Post a Comment