Date- 08-June-2021❣️
रक्ताची नाती:-
रक्त हा मानवी शरीरातील महत्वाचा घटक आहे. दैनंदिन जीवनात रक्ताची गरज मोठ्या प्रमाणात आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी रक्तदाते जोडणे फार गरजेचे आहे. दिवस बदलले, तसे विभक्त कुटुंब पद्धतही तयार झाली. काही अपवाद वगळता सारेच आपल्या मर्जीचे राजे झाले आहेत.
कशी जपावी कुणाकडे
नाही रक्ताची नाती
माणुसकी अन परंपरा
ही सारे विसरुनी जाती
भारताला समृद्ध अशी संस्कृती लाभली आहे. इतिहासही अतिशय प्रगल्भ आहे. दान धर्माची परंपराही फार जुनी आहे. पण आज माणुसकी आणि परंपरा लोक विसरत चालले आहे. रक्ताची नातीही संपुष्टात येत आहे. आपल्यांसाठीही धावून येणारे आता खुप कमी झाले आहेत. तशी कारणंही वेगवेगळी आहे.
अनेक जण आपलं रक्त दान करून नवी नाती जोडत आहे. भेदभावना दूर सारून अशीही नाती कामी येतात. आणि एक बंध तयार होतो, आपुलकीचा त्यांच्यातील ठासून भरलेल्या मानवतेचा. रक्ताची, मानलेली, जोडलेली, जपलेली, सांभाळलेली, नाते कसेही असो, ते कसे टिकवावे याचे सामर्थ्य फक्त नि फक्त संस्कारातच आहे. तेच संस्कार आपल्याला सांगत असते, अडलेल्यांना हात द्या. खचलेल्यांना धीर द्या, गरजवंतांना मदत करा.
रक्तदानातून तीच मानवी मूल्य मानवात रुजली जाईल आणि जीवन आणखीनच सुंदर होईल.
संस्काराचे चीज करा।।
गरजूंना मदत करा.....।।
#विश्वात्मक_औदार्य
◆ मानवतेसाठी दातृत्वाची दिव्य चळवळ ✨
#Bravery_Raktveer😊
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://braveryraktveer.blogspot.com/2021/06/braveryraktveer.com.html
No comments:
Post a Comment