Date- 09-June-2021💫
#विश्वात्मक_औदार्य
◆ मानवतेसाठी दातृत्वाची दिव्य चळवळ ✨
जागतिक रक्तदान दिनानिमित्त....🩸
करता जेव्हा रक्तदान, मी नाती नाही तपासली.......
थेंबा थेंबात रुधिराच्या, फक्त माणुसकी जपली.......🩸
मदत करणे हा प्रत्येक मानवाचा गुणधर्म आहे. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या वेळी कुणाला तरी मदत करीत असतात. रक्तदान हेच श्रेष्ठदान........या वृत्तीने अनेक जण रक्तदान करीत असतात. काहीजण रक्तापलीकडे जाऊन रक्ताची नाती जपतात आणि मानवतेच मोठं वलय निर्माण होते. याच वलयातून माणूस एकमेकांना जोडला जातो, आणि सामूहिक प्रगती सुरू होते. जीवनाच्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजूने विचार करण्याची क्षमता येते. एकंदरीत जगणे सुंदर होते. मानवता जीवन जगण्याचा मार्ग दाखवते. मानवता जोपासण्याचा आणि आचरणात आणण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे रक्तदान आहे.
दान करा रक्ताचे।।
हे कर्तव्य प्रत्येक देशभक्ताचे।।।
✍🏻- शब्दांकन- प्रफुल भोयर यवतमाळ
7057586468
https://www.facebook.com/108169334811370
No comments:
Post a Comment