Date- 10-June-2021❣️
#विश्वात्मक_औदार्य
◆ मानवतेसाठी दातृत्वाची दिव्य चळवळ ✨
जागतिक रक्तदान दिननिमित्ताने...🩸
।।साक्ष।।
समाजातल्या गरजूंसाठी
रक्तदान करू आपण।।
ठरेल मग जन्मांतरीचे
मानवतेचे मूल्य मापन।।
आजही माणसाचा परमेश्वरावर प्रचंड विश्वास आहे. आपल्या धार्मिक संस्कृतीने म्हणा की आईने आपल्यावर केलेल्या संस्काराने म्हणा, पण आपण सामाजिक नितीमूल्याची जाणीव ठेऊनच वागतो. सर्वांच्या वर्तनात साम्य जरी नसेल तरी साधेपणा आणि विवेकबुद्धी नक्कीच आहे. एकमेकांचा आपण किती आदर करतो. इतरांशी कसे वागतो, यावरच मानवी मूल्याचे मापन होत असते.
'विश्वात्मक औदार्य'-मानवतेसाठी रक्तदानाची दिव्य चळवळ गेल्या बरेच दिवसापासून चालू आहे, याला रक्तदानाची दिव्यता मानवतेच्या कसोटीवर तपासून पाहण्याचा मार्गही म्हणता येईल.
आज जागतिक नेत्रदान दिनाच्या निमित्ताने दानाच महत्त्व आपल्या मनास पटवून देणे, हीच प्राथमिकता असायला हवी. कारण एका जिवाच्या अंधारल्या वाटेत प्रकाशासाठी उमेदीचा एक कवडसा आत डोकावणे आहे.
रक्तदान असो, नेत्रदान किंवा अवयवदान या मुळे रुग्णाची रोगावर यशस्वी मात होते आणि रुग्णाला आपल्या आयुष्यात चैतन्य भरण्यासाठी उभारी मिळते. त्यामुळे जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेचा अखंड प्रवाह वाहतो.
"दानाचा संकल्प करूया.....
जीव वाचवूया"......
दानामधून दान देणारा आणि घेणारा दोघेही संतुष्ट होते. ज्या देवांवर ते विश्वासा ठेवतात, त्यांचे स्मरण करून नवीन आयुष्याला सुरुवात करतात. दातृत्वामुळे जन्मांतरीच्या लाभणाऱ्या समाधानाने माणसातच देव असल्याची साक्ष मिळते. म्हणून आपल्याजवळ असलेल्यातल थोडस दान करायलाच पाहिजे.
✍🏻- प्रफुल भोयर (यवतमाळ)
7057586468
No comments:
Post a Comment