निळीसावळी दरी
कडेकपारी भेदून झरती
शुभ्र दुधारी झरे
कळे कुणाची किमया
होती भुरळ मनावरी ll
कसे नसावे कुणास
ठाऊक भय पडण्याचे
वाऱ्यालाही गंमत वाटे
या अथांग उंचीचे ll
पक्षीही जणू आंदण
देती ऋण आठवूनी
गुणगुणावे गीत
सुंदर लोचनी साठवूनी ll
दाट धुक्याची वाट
हरवते रूप लावंण्याचे
पुन्हा एकदा स्वरात येती
गीत कोकिळेचे ll
✍🏻- प्रफुल्ल भोयर

0 Comments