स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ मध्ये पराक्रम दिवस उत्साहात साजरा
यवतमाळ : नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण देशात पराक्रम दिवस साजरा करण्यात आला, यानिमित्त स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ, यवतमाळ येथे निबंध स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या क्रांतिकारी जीवनावर आधारित निबंध सादर केले. पोस्टर स्पर्धेत स्वातंत्र्य संग्राम, नेताजींचे योगदान, देशभक्ती आणि पराक्रम यांचे सुंदर चित्रण करण्यात आले. यानुसार पोस्टर मेकिंग स्पर्धेत कु. वैष्णवी वातीले हिने प्रथम पारितोषिक पटकावले, तर कु. श्वेता लोखंडे ने द्वितीय आणि कु. अर्शियाउलुज शेख ने तृतीय पारितोषिक मिळवले. निबंध स्पर्धेत प्रफुल भोयर याने प्रथम पारितोषिक जिंकले, कु. अर्शियाउलुज शेख ने द्वितीय पारितोषिक आणि कु. ईशा इंगळे ने तृतीय पारितोषिक प्राप्त केले. स्पर्धेचे परीक्षण कु. निवेदिता कोकाटे, प्रा. वंदना पसारी आणि प्रा. पल्लवी हांडे यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पल्लवी हांडे यांनी कुशलतेने सांभाळले. कार्यक्रम समन्वयक म्हणून डॉ. स्वप्नील सगणे, विद्यार्थी विकास अधिकारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वैशाली फाळे होत्या. आभार प्रदर्शन प्रा. वंदना पसारी यांनी केले तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजेश मुनोत सर यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून हा कार्यक्रम यशस्वी ठरला, पराक्रम दिवसाच्या निमित्ताने संपूर्ण कॉलेज परिसरात देशभक्तीचा उत्साह आणि ऊर्जा दिसून आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी चे योगदान लाभले.





0 Comments