दर्डा विधी महाविद्यालयाच्या पुढाकाराने राष्ट्रीय युवा दिनी ‘रन फॉर स्वदेशी’

दर्डा विधी महाविद्यालयाच्या पुढाकाराने राष्ट्रीय युवा दिनी ‘रन फॉर स्वदेशी’

स्वामी विवेकानंद पुतळा अनावरणातून युवकांना राष्ट्रनिर्माणाचा संदेश



यवतमाळ : राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका निर्णायक असून स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरतात, या संकल्पनेतून स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालय, यवतमाळ यांच्या वतीने राष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘युवा दौड – रन फॉर स्वदेशी’ या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत सामका आयुर्वेद रिसर्च सेंटर, यवतमाळ येथे स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

          स्वामी विवेकानंद यांच्या राष्ट्रभक्ती, आत्मनिर्भरता, स्वदेशी विचारसरणी व युवकशक्तीवरील अढळ विश्वासाचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. युवकांनी शारीरिक सुदृढतेसोबत वैचारिक जागृती साधावी, सामाजिक बांधिलकी जोपासावी आणि राष्ट्रउभारणीत सक्रिय सहभाग घ्यावा, हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.

          कार्यक्रमात विधी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवित उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले. ‘रन फॉर स्वदेशी’ या संकल्पनेतून स्वदेशी उत्पादनांचा स्वीकार, आत्मनिर्भर भारताचा संकल्प आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसात पोहोचविण्यात आला.

           या उपक्रमाचे समन्वयक डॉ. संदीप नगराळे व डॉ. स्वप्नील सगणे यांनी कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी प्रभावीपणे केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. विजेश मुनोत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. वैशाली फाळे, प्रा. शंतनु कन्नाके, प्रा. रणजीत आगमे यांच्यासह इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही कार्यक्रमाच्या यशात सक्रिय योगदान दिले. या कार्यक्रमातून स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची आजच्या युवकांना नव्याने ओळख करून देत राष्ट्रप्रेम, आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.













Post a Comment

0 Comments