यवतमाळच्या दर्डा लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय मुट ट्रायल स्पर्धेत सहभाग
यवतमाळ:- नाशिक येथील एन. बी. ठाकूर विधी महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित १८ व्या स्व. ॲड. डी. टी. जयभावे स्मृती राष्ट्रीय मूट ट्रायल आणि जजमेंट रायटिंग स्पर्धेत यवतमाळ येथील स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयाच्या संघाने सक्रिय सहभाग नोंदवला. १४ आणि १५ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत देशभरातील विविध नामवंत विधी महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व न्यायाधीश म्हणुन प्रफुल भोयर, अभियोग पक्ष म्हणून हर्षदीप बांगर, बचाव पक्ष म्हणून फैजान अहमद यांनी केले.
मूट ट्रायल स्पर्धेच्या माध्यमातून भावी वकिलांना प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजाचा अनुभव घेता येतो. या स्पर्धेत सहभागी सदस्यांनी केसचे विश्लेषण, उलटतपासणी, युक्तिवाद आणि जजमेंट रायटिंग यांसारख्या तांत्रिक बाबींमध्ये आपले कौशल्य सादर केले. या अनुभवाचा फायदा त्यांना त्यांच्या भविष्यातील न्यायालयीन कारकीर्दीत निश्चितच होईल.


0 Comments