स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयात 'वीर बाल दिवस' साजरा


◆ परीक्षेच्या तयारीसाठी 'माइंडव्यूह' (Mindvyuh) ॲप विद्यार्थ्यांसाठी देत आहे महत्त्वाची साथ

यवतमाळ:- स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयात आज शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंग यांच्या पुत्रांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ 'वीर बाल दिवस' अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना महाविद्यालयाचे विद्यार्थी  अ‍ॅड. भावेश श्रीराव यांनी  "कमी वयात धर्मासाठी आणि सत्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या साहिबजाद्यांचे जीवन आजच्या तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून धैर्याचा आणि राष्ट्रप्रेमाचा आदर्श घ्यावा," असे प्रतिपादन यांनी केले. या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात महाविद्यालयाचे विद्यार्थी  अ‍ॅड. भावेश श्रीराव यांनी विद्यार्थ्यांना आगामी परीक्षेच्या तयारीसाठी व 'माइंडव्यूह' (Mindvyuh) ॲपच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी महाविद्यालयाचे डॉ. संदीप नगराळे होते, तर कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. स्वप्नील सगणे होते.

            नुकतेच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या 'अविष्कार २०२५' या संशोधन स्पर्धेत भावेश श्रीराव यांनी जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे. त्यांनी विकसित केलेले 'माइंडव्यूह' ॲप सध्या विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरले आहे. आपल्या भाषणात भावेश यांनी सांगितले की, "माइंडव्यूह ॲप" हे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि त्यांना अभ्यासात मदत करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना विषयांचे सखोल ज्ञान मिळावे यासाठी ‘अभ्यास साहित्य’ (Study material)आणि ‘ध्वनिमुद्रित व्याख्याने' (Audio Lectures) यांसारखी विविध वैशिष्ट्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आगामी परीक्षांच्या दृष्टीने हे ॲप अत्यंत उपयुक्त ठरत असून, विद्यार्थी याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत." विशेष म्हणजे, या ॲपमधील अभ्यासक्रम आणि शैक्षणिक साहित्य विकसित करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. यामध्ये प्रामुख्याने प्राचार्य डॉ. विजेश बी. मुनोत, डॉ. संदीप नगराळे, प्रा.स्वप्नील सगणे  आणि प्रा. वैशाली फाले  यांनी विषय तज्ज्ञ म्हणून मदत केली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

     कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संदीप नगराळे यांनी यावेळी भावेश श्रीराव यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून अभ्यासात प्रगती करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्तविक  समन्वयक डॉ. स्वप्नील सगणे यांनी केले. सदर उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजेश बी. मुनोत यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेत 'माइंडव्यूह' ॲपबद्दल उत्सुकता दर्शविली.










Post a Comment

0 Comments