स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयाचा उपक्रम

 स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयाचा उपक्रम

◆ विधी सेवा चिकित्सालयच्या प्यारालीगल स्वयंसेवकाची सामाजिक कामगिरी

यवतमाळ:- येथील स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयाच्या शासनमान्य विधी सेवा चिकित्सालय सामाजिक न्यायाच्या दिशेने महत्वपूर्ण योगदान दिले आहे. प्राचार्य डॉ. विजेश मुनोत आणि डॉ. संदीप नगराळे यांच्या समन्वयाने विधी सेवा चिकित्सालय गरजु नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला, जागरूकता शिबिरे निमित्ताने व्याख्याने विविध समाजसेवी उपक्रम तसेच मदत पुरवते. याद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गासाठी कौटुंबिक विवाद, संपत्तीचे प्रश्न, श्रम कायदे, सायबर गुन्हे इ. सल्ला व दस्तऐवज तयार करण्यास मदत करणे, ग्रामीण भागातील महिला सशक्तीकरण, घरगुती हिंसाचार प्रतिबंध, हक्काची माहिती यावर शिबिराद्वारे समाजातील अंधश्रद्धा दूर करणे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्यातून वंचितासाठी न्याय मिळवून देणे. विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष सहभागातून सामाजिक जबाबदारी ज्यामुळे विद्यार्थी घडवणे अशी महत्वपूर्ण कामे केली जातात. महाविद्यालयाच्या नेतृत्वात ही विधी सेवा चिकित्सालय समाजातील दुर्बल घटकांना न्यायाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.

          विजय राऊत विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी, जिल्हा विधी सेवा स्वयंसेवक असून महाविद्यालयाच्या विधी सेवा चिकित्सालय अंतर्गत स्वखर्चाने सुविशा विक्रांत पाटील या दिव्यांग मुलीला आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र मिळवुन शासकीय योजनांचा लाभासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यास मदत केली. सुविशा ही तिच्या आईसोबत राहते, परिस्थितीचा सामना करत असताना जगण्याची दिशा शोधण्यासाठीच्या तिच्या प्रयत्नात विजय राऊत यांनी मदत्त करून दातृत्वाची नवी ओळख करून दिली.

          महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. विजेश मुनोत, डॉ. संदीप नगराळे,  डॉ. स्वप्नील सगणे, डॉ. वैशाली फाळे तसेच इतर शिक्षक कर्मचारी वृंद यांनी महाविद्यालयाच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.







Post a Comment

0 Comments