जिल्हा परिषद माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात १९९१ दहावी बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
यवतमाळ:- येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, गोधणी रोड येथून इ.स. १९९१ साली दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा “Get Together” स्नेहमेळावा अतिशय उत्साही व भावनिक वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान त्या काळातील आदरणीय शिक्षक डोंगरे सर, यांनी भूषविले तर वर्गशिक्षक मोतीकर सर, निकम सर, भवरे सर, पिंजारकर मॅडम व पट्टेवार मॅडम हे प्रमूख पाहूने म्हनून उपस्थित होते. तसेच सध्याचे शाळेचे प्राचार्य प्रा. साहेबराव पवार सर यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. हा कार्यक्रम नरेंद्र रहाटे, अनूप अहीर, गाइड चव्हाण आणि राजेश नागलकर यांच्या पुढाकाराने आयोजित केला होता.
या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थी व शिक्षकांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी शाळेपासून आजपर्यंतच्या आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीचा सविस्तर आढावा मांडला. हे विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत असून वरिष्ठ पदांवर आहेत. अनुभव, आठवणी, मार्गदर्शन व आपुलकी यांची देवाणघेवाण झाल्याने हा स्नेहमेळावा सर्वांसाठी प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला. शिक्षक व विद्यार्थ्यांमधील जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ करणारा हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. तसेच शाळेच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांनी योगदान देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार नरेंद्र रहाटे यांनी पार पाडले.
यावेळी विवेक पद्मावार, चंद्रशेखर डाहे, दिपेंद्र लोखंडे, पवन जोशी, राजेंद्र फुलझेले, गाईड चव्हाण, नरेंद्र रहाटे, किशोर पांडे, संदीप नगराळे, योगेशसिंह चव्हाण, शामसुंदर अग्रवाल, विशाल गुप्ता, उमेश नानुरीकर, मंगेश गंगलवार, राजेश नागलकर, अनुप अहीर, प्रशांत दुधे,राजेश खडतकर आदी माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.



0 Comments