येदलापूर येथे स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी.....

 येदलापूर येथे स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी 

यवतमाळ : १५ नोव्हेंबर २०२५ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील येदलापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी परिसरात आदिवासी स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरी करण्यात आली.

         कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. श्याम मोहिते सर, अंगणवाडी सेविका, शाळेतील व अंगणवाडीतील सर्व विद्यार्थी तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलनाने झाली. 

मुख्याध्यापक श्री. श्याम मोहिते सर यांनी बिरसा मुंडा यांच्या आदिवासी हक्कांसाठीच्या लढ्याची माहिती दिली. शेवटी सर्वांना प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.




Post a Comment

0 Comments