“अविष्कार” जिल्हास्तरीय स्पर्धेत स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉंच्या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक

 “अविष्कार” जिल्हास्तरीय स्पर्धेत स्वातंत्र्य सेनानी  जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉंच्या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक

यवतमाळ, दि. १२ नोव्हेंबर:संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या वतीने आयोजित “अविष्कार संशोधन संमेलन २०२५” ही जिल्हास्तरीय स्पर्धा जव्हाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, यवतमाळ येथे दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडली. या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आणि नाविन्यपूर्ण विचारांची जाणीव निर्माण करणे आहे. 

        या प्रतिष्ठित स्पर्धेत स्वातंत्र्य सेनानी जव्हाहरलाल दर्डा लॉ कॉलेज, यवतमाळ येथील पदव्युत्तर विद्यार्थी भावेश रवि  श्रीराव याने सी.एम.एल. (कॉमर्स, मॅनेजमेंट अँड लॉ) या गटात प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा गौरव वाढविला.

          भावेश याने सादर केलेला "माइंडव्यूह " (Mindvyuh)   हा प्रकल्प विद्यार्थ्यांच्या अभ्यास व संशोधन कार्यासाठी उपयुक्त ठरेल असा नाविन्यपूर्ण उपक्रम असून, तो भावेशने प्रो-बोनो (विनामूल्य) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. या प्रकल्पाचे उपयुक्ततेसाठी परीक्षकांनी विशेष कौतुक केले.

      भावेश यांना या प्रकल्पासाठी प्राचार्य डॉ. विजेश बी. मुनोत यांचे मार्गदर्शन लाभले तसेच  महाविद्यालय समन्वयक डॉ. स्वप्नील  सगणे यांचे सहकार्य प्राप्तझाले .

         भावेशच्या या यशाबद्दल महाविद्यालय व्यवस्थापन, प्राचार्य तसेच अध्यापक व शिक्षकेत्तर  कर्मचारीवर्ग यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयाचा गौरव झाला असून, भावेश विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.







Post a Comment

0 Comments