आभार....✨🌺
मी लेखक होणार हे माझं अस कधी ठरलेलं नव्हतंच, पण म्हणतात ना कुणी लेखक होणार असेल तर तो होतोच. आपण स्वतःही त्यापासून दूर जाऊ शकत नाही. मी लेखक म्हणून नावारूपास येणार अस कधीच स्वप्नातही वाटल नाही. पण झालोच "विश्वात्मक औदार्य" या पुस्तकाचा. याच पुस्तकामुळे मी लोकांपर्यत पोहोचलो. बरेचजण मला या पुस्तकाच्या यशानंतर ओळखायला लागली. बऱ्याचदा आपल्याकडून कुणालातरी मदतीची अपेक्षा असते, आपल्यामुळे कुणाच्या तरी चेहऱ्यावर समाधानाची लाट पसरावी, यासाठी मी प्रयत्न केले. त्यातून मला आपोआपच लिहिण्याची आवड निर्माण झाली. हा मुलगा फक्त कथा रचत नाही तर प्रत्यक्ष मनातून शांततेसाठी प्रयत्न करतो, असा विश्वास बघणाऱ्या सर्वांना आला. यानंतर मला प्रेरक म्हणून बघितलं गेलं. या आदररूपी प्रोत्साहनातून एक दिशा मिळत गेली. मी एक Blog बनवला. त्यात जे काही केलं, पाहिलं आणि अनुभवलं हेच लिहीत गेलो, लोकांना तो आवडला. मानवतेचा संदेश समाजात देणारा Blog लोकांना इतका आवडला की ते पुस्तक रुपात मांडावच लागलं. हे पुस्तक माझी ओळख कधी बनली हे माझं मलाच कळलं नाही. मी, माझं लिखाण, माझे आजवरचे सर्व अवॉर्डसही सर्वांसाठी कल्पनारम्यच आहे. या सर्वांच्या पाठीमागे आहे माझं घर आणि माझी माणसं. प्रत्येक गोष्टीसाठी Comfort झोन मिळतोच असे नाही ना त्यामुळे मलाही Compromise करावंच लागलं. मग त्यातूनच निर्माण झाली नवी प्रेरणा जगण्याची आणि घडण्याची. आपल्या मागे आपल्याविषयी कोण काय बोलतं हे आपल्याला माहीत नसते पण मी खरंच भाग्यवान आहे माझ्यावर जीव लावणारी माणसे माझ्या अवतीभवती आहे. आणि असणारही आहे.
लेखक आपल्या पुस्तकातील पात्रांना त्याच्या योग्यतेनुसार न्याय देत असतो पण तीच माझी पात्रे मला माझी पुढची दिशा दाखवतात. आज मला फक्त रक्त हवंय म्हणून फोन नाही येत तर कविता कशी लिहायची म्हणून मार्गदर्शन मागतात, कायद्यात शिकतोय म्हणून सल्ला घेण्यासाठी फोन येतात, पुढचं पुस्तक कधी येताय म्हणून वाट पाहणारेही आहे, ज्याची मला कल्पनाच नाही असे म्हणजे प्रेरणा मिळते म्हणून प्रेमाने ब्लॉग उघडला जातो. एकाने तर सांगितले मी टोकाच्या निर्णयापर्यंत पोचल्यावर मी तुला पाहून जगायला शिकलो. म्हणून भावनिक लिहिण्याचा प्रयत्न केलाय.माणसाने नेहमी नाविन्याचा ध्यास घ्यायला पाहिजे. सोबत योग्य अयोग्याची जाणही हवीच. पण भविष्य चांगलं व्हावं यासाठी वर्तमानात आपण इतिहासाचा अभ्यास करतोच ना. कडू गोड आठवणी सोबत घेऊन जगत राहतो आपण आपलं आयुष्य.
याच आयुष्याला अधिक सुंदर बनवणारा दिवस म्हणजे वाढदिवस. माझा प्रत्येक वाढदिवस अधिकच खास असतो माझ्यासाठी आणि माझ्या माणसांसाठीसुद्धा बर का! ती लहान मूलं वाढदिवसाची वाट पाहतात तर काही आठवणी सांगतात, अस वाटते अगदी योग्य जागी जन्म घेतलाय मी. अगदी भरभरून प्रेम करणारी माणसे आहेत कारण ती माझी माणसं आहे. अशा सर्वांना म्हणजेच प्रत्येकाला मनःपूर्वक धन्यवाद देतो......
-- प्रफुल्ल भोयर










0 Comments