स्वप्नांना पंख नवे .....

 स्वप्नांना पंख नवे 


न्यायाची वाट तुझी

त्याग सत्याची साथ

स्वप्नांना पंख नवे 

शोध तू आकाश ।।

विश्वास मिळो सकळा

धाडसी हो साज

पसरू दे प्रवाही

बुद्धी चा प्रकाश ।।

प्रेरणाही देतसे

जगण्याची आस

तेजाचा सूर मिळो 

प्रत्येका खास।।

स्वप्नांना पंख नवे

शोध तू आकाश

स्वप्नांना पंख नवे

शोध तू आकाश।।


✍🏻- प्रफुल भोयर

PRAFULBHOYAR.BLOGSPOT.COM





Post a Comment

0 Comments