स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयात प्रथम विमुक्त भटके दिवस उत्साहात साजरा
यवतमाळ : भटक्या-विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांच्या जीवनमानातील प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयात ३१ ऑगस्ट रोजी प्रथम विमुक्त भटके दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने निबंध स्पर्धा आणि ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना विविध कायद्यांची माहिती या व्याख्यानातून देण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. स्वप्नील सगणे यांनी केले असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. निबंध स्पर्धेचे परीक्षण प्रा. सुचिता ढेरे यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजेश मुनोत यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
निबंध स्पर्धेत प्रफुल गणपत भोयर यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर श्याम विनोद भोयर आणि देवेश राऊत यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे, प्रफुल गणपत भोयर यांनी जिल्हा स्तरावरही प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा गौरव वाढविला. प्रथम विमुक्त भटके दिवस औचित्याने झालेल्या या जिल्हा स्पर्धेत त्यांचा गौरव समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सौ. मंगला मुन, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक श्री. ओमप्रकाश नगराळे तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.












0 Comments