रॅगिंग एक अभिशाप...

 रॅगिंग एक अभिशाप


      रॅगिंग एक गंभीर समस्या आहे, ज्याला आपण अभिशाप म्हणू शकतो. ती नवीन विद्यार्थ्यांवर मानसिक आणि शारीरिक त्रास देणारी प्रथा आहे,जी त्यांच्या आत्मविश्वासाला आणि सुरक्षिततेला धोका पोहचवते.


रॅगिंग म्हणजे काय?

          विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला ठेच पोहचवणारी एक प्रकारची नकारात्मकता आहे. ही एक अमानवीय आणि हानिकारक प्रथा आहे. ज्यामध्ये जेष्ठ विद्यार्थी नवीन विद्यार्थ्यांना मानसिक, शारीरिक किंवा भावनिक त्रास देतात.

      रॅगिंग अनेकदा 'मजा', 'परंपरा', किंवा 'नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत' या नावाखाली केली जाते, रॅगिंगमुळे विद्यार्थ्यांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ धोक्यात येते. 


रॅगिंगची परिभाषा:-

          रॅगिंग ही अशी कृती आहे ज्यामध्ये जेष्ठ विद्यार्थी आपल्या वरीष्ठतेचा किंवा गटबळाचा गैरवापर करुन नवीन विद्यार्थांना छळतात, त्यांचा उपहास करतात किंवा अपमानास्पद गोष्टी करायला भाग पडतात.


रॅगिंगचा उद्देश:-

        रॅगिंगचा उद्देश अनेकदा नवीन विद्यार्थ्यांना शिस्त शिकवणे त्यांना गटात सामील करणे किंवा त्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित करणे असतो किंवा कणखर बनवण्याचा हेतू असतो.


स्वरुप:- 

मानसिक छळ: टोमणे मारणे, अपमानास्पद टिप्पणी, धमकी देने, नवीन विद्यार्थ्यांना लाज वाटेल अशी कृती करायला लावणे.


शारीरिक छळ: मारहाण, धक्काबुक्की, शारीरिकदृष्ट्या त्रास देणारी गोष्टी करायला लावणे.


लैगिक छळ: आक्षेपार्ह टिप्पणी, विनोद, लैगिक स्वरूपाचा त्रास.


भावनिक छळ: विद्यार्थ्यांना एकटे पाडणे, वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करणे, असुरक्षित वातावरण निर्माण करणे.


आर्थिक शोषण: पैसे खाद्यपदार्थ किंवा इतर वस्तू मागणे.


अकादमीक दबाव: असाईनमेंट, प्रॅक्टिकल करायला लावणे, नोट्स, पुस्तके लपवणे.


परिणाम:-

         रॅगिंगमुळे विद्यार्थ्यांवर खोलवर मानसिक परिणाम होऊ शकतात जे त्यांच्या शैक्षणिक सामाजिक आणि वैयक्तिक जीवनावर दीर्घकालीन प्रभाव टाकतात.


१) भीती आणि चिंता

      रॅगिंगमुळे विदयार्थ्यांमध्ये सतत भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते. विशेषतः नवीन विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाण्याची भीती वाटू शकते. ज्यामुळे आत्मविश्वास कमी होतो.


२) नैराश्य

      रॅगिंगमुळे अपमान उपहास किंवा शारीरिक त्रास सहन करावा लागतो. ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता एकटेपणा आणि नैराश्य वाढून गंभीर मानसिक आजार उद्दभवू शकतो.


३) स्वाभिमान कमी होणे

       सततच्या अपमानामुळे विद्यार्थ्यांच्या स्वतःबद्दलचा विश्वास डळमतो. ते स्वतःला कमी लेखू लागतात आणि सामाजिक संवाद टाळतात.


४) पोस्ट- ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर

       गंभीर रॅगिंगच्या घटनांमुळे जसे की शारीरिक किंवा लैगिंक छळ विद्यार्थ्यांना PTSD सारखे विकार होऊन यामध्ये फ्लॅशबॅक झोप न लागणे तीव्र तणाव ही लक्षणे आढळतात.



५) सामाजिक लागावं नसणे

      रॅगिंगमुळे विद्यार्थी मित्र बनवण्यास किंवा सामाजिक गटांमध्ये सहभागी होण्यास घाबरतात. यामुळे त्यांचा सामाजिक विकास खुंटतो आणि ते एकटे पडतात.


६) शैक्षणिक कामगिरीवर परिणाम

     मानसिक तणावामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासावरून कमी होते. व शैक्षणिक कामगिरी खालावून ते शिक्षण सोडून जातात.


७) आत्महत्येच्या विचारांचा धोका रॅगिंगमुळे आत्महत्येचा विचार येऊन आपले जीवन संपवितात.


उदाहरणे:-

१) २००९ मध्ये आंध्रप्रदेशातील मेडिकल कॉलेज मध्ये रॅगिंगमुळे एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केली होती.


२) नवीन विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत गाणी गायला लावणे नाचायला सांगणे.


३) त्यांना अवमानकारक टोपणनावे देणे किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आक्षेपार्ह प्रश्न विचारने.


रॅगिंग कशी होते ?

वेळ आणि ठिकाण: 

      रॅगिंग सहसा कॉलेजच्या पहिल्या काही महिन्यात, विशेषतः नवीन विद्यार्थी दाखल झाल्यावर, हॉस्टेल कॉरिडॉर, कँटीन किंवा कम्प्समधील एकांत ठिकाण येते.


गटबाजी:

      रॅगिंग बहुतेकता जेष्ठ विद्यार्थ्यांचा गट एकत्र येऊन करतो, ज्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना विरोध करणे कठीण जाते.


परंपरा आणि प्रचार:

      काही ठिकाणी रॅगिंगची परंपरा म्हणून प्रचार केला जातो.

Post a Comment

0 Comments