स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ मध्ये करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
यवतमाळ : स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ, यवतमाळ येथे करिअर कट्टासह स्पर्धात्मक परीक्षा मार्गदर्शन कक्ष आणि करिअर समुपदेशन व मार्गदर्शन कक्षाच्या वतीने विशेष करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील संधी, तयारीचे मार्ग आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये याविषयी मार्गदर्शन देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजेश मुनोत होते. विशेष मार्गदर्शक म्हणून डॉ. साईनाथ वाडजे, संचालक वाडजे कॅरिअर ॲकॅडमी यवतमाळ यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना "स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी" यावर सखोल मार्गदर्शन केले. करिअर घडविण्यासाठी आवश्यक सुचना दिल्या. त्यांनी स्पर्धात्मक परीक्षा, न्यायव्यवस्था, प्रशासन, कॉर्पोरेट क्षेत्र, तसेच उद्योजकता याबाबत माहिती दिली.
वाडजे करीअर अकॕडमी आणि अमोलकचंद महाविद्यालय व विधी महाविद्यालय यांचे मधे नुकताच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यासाठी एमओयु करार झाला असून यापुढे ईच्छूक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या वेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली आणि योग्य दिशादर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयक डॉ.संदीप नगराळे यांनी केले, सुत्रसंचलन आयशा खान यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. वैशाली फाले यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन स्पर्धात्मक परीक्षा मार्गदर्शन कक्ष व करिअर समुपदेशन कक्षाच्या टीमने केले.
विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन उपक्रमाचा चांगला लाभ घेतला असून, भविष्यात असे उपक्रम नियमितपणे राबवावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली.




0 Comments