स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश !

 स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश !

◆ गौरव करताना न्यायमूर्ती अश्विन भोबे उच्च न्यायालय मुंबई

यवतमाळ: एन.बी.ठाकूर विधी महाविद्यालय, नाशिक येथे पार पडलेल्या 17 व्या दिवंगत अॕड. डी. टी. जायभावे राष्ट्रीय मुट ट्रायल आणि  जजमेंट रायटींग स्पर्धेत  स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ, यवतमाळ च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामधे त्यांना वैयक्तिक पारीतोषिक मिळाले.

          दोन दिवसीय चाललेल्या या स्पर्धेत न्यायाधीश म्हणून प्रफुल गणपत भोयर, अभियोग पक्ष म्हणून हर्षदीप बांगर आणि बचाव पक्ष म्हणून रोशन गवई यांनी महाविद्यालयाचे नेतृत्त्व केले होते. त्यामधे हर्षदीप बांगर याने उलट तपासणीसाठीचा पुरस्कार जिंकला.

         मराठी भाषेचा गौरव करत मराठीचे न्यायालयीन महत्त्व आणि न्यायची संकल्पना मांडण्यासाठी तसेच न्यायालयीन कौशल्य, अनुभव यांची सांगड कशी घालावी हे समजण्यासाठी नवोदित वकिलांसाठी कायद्याचे  शिक्षण तसेच ज्ञान आत्मसात करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.

           प्राचार्य डॉ. विजेश मुनोत, डॉ. संदीप नगराळे, अॕड. रविंद्र सोनटक्के,अॕड. रंजीत अगमे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या प्रयत्नात विद्यार्थ्यांना सुयश लाभले. त्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.






























Post a Comment

0 Comments