स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ येथे 'न्यायशास्त्राच्या कलेविषयी' मार्गदर्शन सोहळा संपन्न...

स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ येथे 'न्यायशास्त्राच्या कलेविषयी' मार्गदर्शन सोहळा संपन्न 



यवतमाळ:-  स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ, यवतमाळ येथे 'न्यायशास्त्राच्या कला' या विषयावर एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. जयवंत घुरडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी न्यायशास्त्रातील मूलभूत संकल्पना, कायद्याचे महत्त्व आणि त्याची सामाजिक बांधिलकी यावर सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी या व्याख्यानातून कायद्याच्या क्षेत्रातील करिअरच्या संधी आणि आव्हानांबाबत मौलिक माहिती मिळवली. 

          विधिज्ञ कायद्याच्या क्षेत्रातील महत्वाचे व्यक्तिमत्त्व आहे. कायद्याच्या बाबतीत सल्ला देणारे आणि न्यायालयात प्रतिनिधित्व करणारे न्यायशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. वकिली करताना कायद्याचे चांगला अभ्यास असावा लागतो. जिद्दीची कास धरत आपला व्यवसाय मजबूत करण्यासाठी आवश्यक असणारे बारकावे जेष्ठ विधिज्ञ अ‍ॅड जयवंत घुरडे यांनी उलगडून दिले. या जागतिक व्यवसायाविषयी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की न्याय सर्वांसाठी आहे, प्रत्येकाला आपली बाजु मांडण्याची संधी आहे. वकिलांनी न्यायप्रक्रिया लक्षात घेता सर्वांच्या सहयोगाने कार्य करणे महत्वाचे ठरते. व्यवसायिक आवश्यकता, दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे हाताळताना आवश्यक व्यावसायिक गरजा पाहता विविध कायद्याची मदत कशी होते हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. व्यावसायिक नीतिमत्ता जोपासताना एक वकील म्हणुन जबाबदारी, कर्तव्ये, राहणीमान, वागणून आणि समजदारी असावी हे अ‍ॅड घुरडे सरांनी व्यवस्थित समजावून दिले.

         कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले प्राचार्य डॉ. विजेश मुणोत सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कायद्याच्या शिक्षणाचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात प्रामाणिकपणे योगदान देण्याची गरज यावर भर दिला. वाचाल तर वाचाल आणि वाचवाल, या प्रमाणे वाचनाची सवय वकिलांना सर्वोच्च ठिकाणी पोहचवते, वाचनामुळे   कार्यात परिपूर्णता येते, प्रामाणिकता, शूरता आणि नीतिमत्ता वाढीस लागते. भाषेची कला, सहनशीलता आणि सामंजस्य यामुळे वकिलाचे व्यक्तिमत्त्व खुलते आणि ज्ञानात भर पडून वकिलीची कला साधता येते.


कार्यक्रमाच्या सरते शेवटी डॉ. संदीप नगराळे सर यांनी सर्वांचे आभार मानले. या व्याख्यानमालेला लाभलेल्या  विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाला पाहता भविष्यातील वकिलांना प्रेरणादायी ठरेल असा संदेश दिला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कॉलेजच्या प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास डॉ. स्वप्निल सगणे, डॉ. वैशाली फाळे, प्रा. अंजली दिवाकर, प्रा. वंदना पसारी, प्रा. योगिता बोरा, प्रा. अमिता मुंधडा, प्रा. शंतनु कनाके, प्रा. पल्लवी हांडे, प्रा. मृणाल काटोलकर आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments