स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉच्या विद्यार्थ्याला जिल्हा युवा पुरस्कार...

 स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉच्या विद्यार्थ्याला जिल्हा युवा पुरस्कार

◆ महाराष्ट्र दिनी पालकमंत्री यांचे हस्ते प्रफुल्ल भोयर सन्मानित



यवतमाळ:- महाराष्ट्र दिनी यवतमाळ येथील समता मैदानावर झालेल्या शासकीय कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचा जिल्हा युवा हा मानाचा पुरस्कार प्रफुल गणपत भोयर यांना देण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे मंत्री मा. संजय राठोड पालकमंत्री यवतमाळ जिल्हा यांनी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी रक्तदान क्षेत्रातील बहुमोल कार्यासाठी सन 2023-24 चा पुरस्कार प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम सह प्रफुल्ल यांना प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक कुमार चिंता, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली.

            प्रफुल हा विधी शाखेचा विद्यार्थी असून त्याचे शिक्षण स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ यवतमाळ येथे वकिलीचे शिक्षण घेत आहे, प्रफुल्ल यांनी रक्तदान क्षेत्रात विविध मार्गाने जनजागृती करून गरजूंना मोफत रक्तपुरवठा, रक्तदाते उपलब्ध करून जीवनदाता ठरला आहे. शिक्षण घेत असताना आपण समाजासाठी काहीतरी करू या निस्वार्थ भावनेतून रक्तदान जनजागृतीची चळवळ उभी केली, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या बहुमोल योगदानाने प्रफुल्ल यांनी यशस्वी ठरवत शेकडो रक्तदाते तयार केले. याचे फलस्वरूप आजचा जिल्हा युवा पुरस्कार असल्याच मत प्रफुल्ल यांनी व्यक्त केलं. प्रफुल्ल चे सर्वत्र समाजात कौतुक होत आहे, रक्तदानाने जीव वाचवून मानवता जोपासण्याचे कार्य प्रफुल करत असल्याचे यावरून दिसून आले. 

        विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा, सचिव सीए प्रकाश चोपडा, उपाध्यक्ष अँड प्रवीण जानी व डॉ. ललित निमोदिया यांनी प्रफुल चे कौतुक केले तसेच स्वातंत्र्य  सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ चे प्राचार्य डॉ. विजेश मुनोत सर तथा शिक्षक वृंद यांनीही कौतुक केले. ही बाब सर्व युवा पिढीला प्रेरणा देणारी ठरली आहे हे निश्चित.
















Post a Comment

0 Comments