जवळा येथे 2 मार्च रोजी शासकिय योजनांचा महामेळावा
मेळावा तयारीचा आढावा
यवतमाळ, दि. 18 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळच्यावतीने आर्णी तालुक्यातील जवळा येथे शासकिय सेवा व योजनांचा महामेळावा आयोजिन करण्यात आला आहे. मेळाव्याच्या अनुषंगाने जिल्हा न्यायालायात आढावा घेण्यात आला.
बैठकीला यवतमाळ व आर्णी येथील सर्व शासकिय कार्यालयातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय योजनांची माहिती व्हावी, त्यांना लाभ घेता यावा यासाठी मेळावा घेण्यात येत आहे. विविध शासकिय कार्यालयामार्फत सामान्य जनतेस मिळणाऱ्या शासकिय योजनेची प्रत्यक्ष अमंलबजावणी करून घेवून त्यांना त्यांचा प्रत्यक्ष लाभ मिळुन देण्याबाबत उपस्थित सर्व कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले.
सदर शिबीरांतर्गत तहसिल कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, त्यात उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलिअर तसेच अधिवास व सातबारा इत्यादी तसेच पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना जसे घरकुल योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रम, समाजकल्याण मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, कामगार विभाग, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व विविध शासकीय योजनांची अमंलबजावणी सदर महामेळाव्याच्या ठिकाणी होणार आहे.
जास्तीत जास्त नागरीकांनी रविवार दि. 2 मार्च रोजी श्री. गुरूदेव विद्या मंदीर व कनिष्ठ महाविद्यालय मौजा जवळा, ता. आर्णी, येथे होणाऱ्या सदर शासकिय सेवा व योजनांचा महामेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल नहार यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment