स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ च्या शैक्षणिक सहलीमधे येरवडा कारागृहाला भेट
यवतमाळ: स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ ची शैक्षणिक सहल नुकताच ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन उत्साहात पार पडली. चार दिवसाच्या या सहलीत विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक स्थळांच्या अभ्यासासह प्रेक्षणीय स्थळांवर सहलीचा आनंद लुटला. कायद्याच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील व्यावसायिक सरावासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास व्हावा या उद्देशाने पुणे येथील ऐतिहासिक येरवडा मध्यवर्ती कारागृह, महिला कारागृह, खुले कारागृहाला भेट दिली. कारागृहात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना सुधारणे, पुनर्वसन, शिक्षण, आणि कल्याणासाठी काम कसे करतात, याचे निरीक्षण कायद्याच्या विद्यार्थ्यांना करता आले. कारागृहाची प्रक्रिया आणि कार्यपद्धती विद्यार्थ्यांनी समजून घेतल्या, कायदेविषयक शिक्षणाची गरज पाहता येरवडा येथील तुरंग भेट विशेष आकर्षण ठरले.
तसेच पुणे मधील शनिवार वाडा, दगडूशेठ गणपती, लाल महाल, तुळशीबाग, राजीव गांधी राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय कात्रज, अलिबाग मुरुड समुद्र किनारा, काशीद किनारा, मुरुड-जंजिरा किल्ला, कार्ला लेणी आणि एकविरा देवस्थान लोणावळा याठिकाणीही भेट दिली. मुरुड जंजिरा किल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहता तेथील इतिहास समजून घेतला.
या सहली मधे डॉ. स्वप्निल सगणे, डॉ. वैशाली फाळे, मनोज गौरखेडे, राजेश राठोड यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत मेहनत घेतली, तर या सहली करिता प्राचार्य डॉ. विजेश मुनोत, डॉ. संदीप नगराळे यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment