समाज सुरक्षित बनविण्यासाठी पोलिसांच्या कर्तव्याचा आदर करा
![]() |
| ◆ विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शहर पोलीस स्टेशन ला शैक्षणिक भेट |
यवतमाळ:- समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखणे, हे पोलीस अधिकाऱ्यांचे प्राथमिक कर्तव्य आहे. कायदे प्रत्यक्षात आणण्यासाठी पोलिसांची भूमिका अधिक महत्वाची असते. लोकांच्या सामाजिक जीवनावर नियंत्रण ठेवणारे कायदे व्यवस्थित अंमलबजावणीत येतात की नाही याची खात्री पोलीस नेहमीच करत असतात. आपल्या देशात पोलिसांचे वेगवेगळे विभाग आहेत, त्या बरोबरच त्यांची भूमिकाही वेगवेगळीच आहे. देशातील नागरिकांच्या स्वातंत्र्यावर बंधने येऊ नये, नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर बाधा येऊ नये यासाठी पोलीस 24 तास धडपडत असतात. आपण पोलिसांविना समाजाची कल्पनाच करू शकत नाही. गुन्हेगारीचा धोका कमी करणे, लोकांचे आणि समुदायांचे संरक्षण करणे आणि कायदा मोडणाऱ्यांना शिक्षा करणे. या भूमिकेतील पोलीस यंत्रणा जाणून घेण्यासाठी तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत प्रात्यक्षिक ज्ञान अवगत करण्यासाठी स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ यवतमाळ च्या विद्यार्थ्यांनी शहर पोलीस स्टेशन यवतमाळ येथे शैक्षणिक भेट दिली.
पोलीसांची कामे जाणून घेण्यासाठी पोलिस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर पणे मार्गदर्शन केले. गुन्हेगारी न्याय व्यवस्थेत गुन्ह्यांचा तपास आणि संशयितांना अटक पोलीस करतात. अशी विस्तृत माहिती यावेळी विद्यार्थ्यांना मिळाली. पोलीस स्टेशन मध्ये असलेल्या सर्व विभागीय कामकाजाची माहिती पोलीस निरीक्षक आणि त्यांचे इतर अधिकारी पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील कावरे, प्रकाश पाटील , संजय आत्राम, गजानन हरणे आदींनी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना करून दिली. प्राचार्य डॉ. विजेश मुनोत यांच्या मार्गदर्शनात डॉ. संदीप नगराळे प्रा. अंजली दिवाकर, प्रा. मृणाल काटोलकर यांनी सदर अभ्यासभेट घडवून आणली.
![]() |
| शहर पोलिस स्टेशन यवतमाळ |
![]() |
| नागराळे सर आणि पीएसआय स्वप्नील कवरे सर यांच्यासोबत |









0 Comments